३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:58 PM2017-09-07T12:58:08+5:302017-09-07T12:59:17+5:30

पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़

 Give the price of 3500 rupees, then only light up the chorus: Raghunath Patil, the aggressor holy at the Farmers' Conference of the Shakunu Samiti | ३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

३५०० रुपये भाव द्या, मगच धुराडे पेटवा : रघुनाथ पाटील, सुकाणू समितीच्या पंढरपुरातील शेतकरी परिषदेत आक्रमक पवित्रा

Next
ठळक मुद्देआता शेतकरी विरुद्ध सरकार लढाई सुरू २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि ७ : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला त्वरित प्रति मे़ टन ५०० रुपयांचा हप्ता आणि आगामी हंगामासाठी उसाचा पहिला हप्ता प्रति मे़ टन ३५०० रुपये जाहीर करावा, मगच धुराडे पेटवा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक पवित्रा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी घेतला़
पंढरपुरातील संत तुकाराम भवन येथे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत ते बोलत होते़ व्यासपीठावर सुकाणू समितीचे सदस्य बाबा आढाव, संजय पाटील-घाटणेकर, पंजाबराव पाटील, बी़ जी़ पाटील, डॉ़ अजित नवले, किशोर ढमाले, करण गायकर, गणेश जगताप, गणेश कदम, सुशीला मोराळे, माऊली पवार, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, माऊली हळणवर आदी उपस्थित होते़
शेतकºयांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे असे सांगून रघुनाथ पाटील म्हणाले, आता शेतकरी विरुद्ध सरकार अशी लढाई सुरू झाली आहे़ सरकारने कर्जमाफी जाहीर केली, पण त्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे़ आॅनलाईन कर्जमाफी अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर दिली आहे़ पण पुन्हा तारीख वाढण्याची शक्यता आहे़ कारण सध्या सर्व्हर डाऊन होत असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी कर्जदार शेतकºयांची खरी आकडेवारी समोर येईल़ त्यानंतर संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल़ २०१९ साल उजाडल्याशिवाय शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही़ कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय षडयंत्र आहे़ आता खरीप हंगाम गेला़ दिवाळीनंतर रब्बी हंगाम येईल तरीही शेतकºयांना कर्ज मिळणार नाही़ केवळ शेतकºयांना अडचणीत ठेवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़
याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य संजय पाटील- घाटणेकर, डॉ़ अजित नवले, माऊली पवार, सुशीला मोराळे यांनी भाषणातून शेतकºयांच्या समस्या मांडत सरकारवर जोरदार टीका केली़ शिवाय २६ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होत असलेल्या शेतकरी परिषदेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले़
------------------------
भाजपाचा सरपंच नको
लोकसभा, विधानसभेत आघाडी सरकार नको म्हणून युतीला निवडून दिले़ त्यांनीही निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही़ शेतकºयांची तर निव्वळ फसवणूक केली़ नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मिळालेल्या यशाने भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे; मात्र आता त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा एकही सरपंच होणार नाही याची काळजी शेतकºयांनी घेतली पाहिजे़ या निवडणुकीत भाजपाचा पराभव झालाच पाहिजे, असे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले़

Web Title:  Give the price of 3500 rupees, then only light up the chorus: Raghunath Patil, the aggressor holy at the Farmers' Conference of the Shakunu Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.