आरक्षण द्या, अन्यथा गाड्या अडवू -विखे
By admin | Published: August 27, 2015 02:39 AM2015-08-27T02:39:06+5:302015-08-27T02:39:06+5:30
मराठा, धनगर व मुस्लिम समाजांच्या आरक्षणासंदर्भात सरकारने १५ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारून मंत्र्यांच्या गाड्या अडविण्यात येतील,
मुंबई : मराठा, धनगर व मुस्लिम समाजांच्या आरक्षणासंदर्भात सरकारने १५ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा जिल्ह्याजिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारून मंत्र्यांच्या गाड्या अडविण्यात येतील, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे.
विखे-पाटील यांनी आज गांधी भवनस्थित प्रदेश काँग्रेस कार्यालयात शेतकऱ्यांचे प्रश्न व राज्यातील
विविध समस्यांवर पत्रकारांशी
संवाद साधला. ते म्हणाले
की, आरक्षणाबाबत सरकारची अनास्था कायम राहिल्यास लोकभावनेचा उद्रेक होईल आणि याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल. आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पंतप्रधानांना त्यांच्याच राज्यात लष्कराला पाचारण करावे लागत आहे.
महाराष्ट्रात सत्तेत आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेण्याची घोषणा केली होती. पण
सत्तेवर येताच त्यांनी घूमजाव केले, अशी टीकाही विखे यांनी
केली. (विशेष प्रतिनिधी)