राज्यातील शिक्षकांना वेतन दाखला द्या

By admin | Published: November 12, 2016 04:13 AM2016-11-12T04:13:52+5:302016-11-12T04:13:52+5:30

राज्यातील शिक्षकांना पुढील महिन्यापासून दरमहा वेतन दाखला (सॅलरी सर्टिफिकेट) देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत

Give the salary certificate to teachers in the state | राज्यातील शिक्षकांना वेतन दाखला द्या

राज्यातील शिक्षकांना वेतन दाखला द्या

Next

मुंबई : राज्यातील शिक्षकांना पुढील महिन्यापासून दरमहा वेतन दाखला (सॅलरी सर्टिफिकेट) देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाचा फायदा राज्यातील साडेसात लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.
याआधी शिक्षक परिषदेने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन दाखला देण्याची मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. त्याची दखल घेत राज्याच्या शिक्षण संचालकांनी ८ नोव्हेंबर रोजी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना आदेश दिले आहेत. संचालकांच्या आदेशानुसार, प्रत्येक महिन्यात शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेतरांना वेतन दाखला द्यावा लागेल. शासनाकडून शाळा प्रशासनामार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन दिले जाते. त्यात महागाई भत्ता, घरभाडे व अन्य भत्त्यांचा समावेश असतो.
पगारातून होणारी कपात व प्रत्यक्ष बँक खात्यावर जमा होणारी रक्कम इत्यादींची माहिती वेतन दाखल्यावर असते. मात्र वेतनाची लेखी माहिती देण्यात अनेक शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक परिषदेकडे केल्या होत्या. 

Web Title: Give the salary certificate to teachers in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.