आरएसएसमध्ये महिलांना प्रवेश द्या - तृप्ती देसाई
By Admin | Published: April 28, 2016 08:17 AM2016-04-28T08:17:26+5:302016-04-28T08:40:41+5:30
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर मंदिरातील महिला प्रवेशाचा लढा यशस्वी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. तृप्ती देसाईंनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून आरएसएसमध्ये महिलांना समान प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये त्यांनी सरसंघचालकांच्या भेटीचीही वेळ मागितली आहे. आरएसएशी संबंधित असणारा भारतीय जनता पक्ष महिला मतांच्या आधारावर सत्तेत आला. आता महिलांना आरएसएसमध्ये स्थान मिळाले पाहिजे. मोहन भागवत पुढारलेल्या विचारांचे असून, ते आमच्या मताचा आदर करतील असे देसाई यांनी सांगितले.
चार हजार महिला सदस्य संख्या असणारी भूमाता ब्रिगेड आजपासून मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन सुरु करणार आहे. त्यानंतर भूमाता ब्रिगेड केरळमधील शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशासाठी आंदोलन करणार आहे.
I think Mohan Bhagwat ji is a progressive thinker & he'll respect our stand of entry for women in RSS: Trupti Desai pic.twitter.com/fWkTC9kJDq
— ANI (@ANI_news) April 28, 2016