मराठी भाषा गौरव दिनी विविध वाड्ःमय पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 10:25 PM2018-02-27T22:25:52+5:302018-02-27T22:25:52+5:30

शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात येतील.

Giving many different Marathi awards for Marathi language gaurav | मराठी भाषा गौरव दिनी विविध वाड्ःमय पुरस्कार प्रदान

मराठी भाषा गौरव दिनी विविध वाड्ःमय पुरस्कार प्रदान

Next

मुंबई : शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षापासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केले. मराठी भाषा गौरव दिनी विविध साहित्यिकांना विविध वाड्ःमय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, भाई गिरकर, आशिष देशमुख यांचेसह ज्येष्ठ साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते. यावेळी  तावडे म्हणाले की, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे तयार करण्यात आले असून आगामी काळात हे गाव प्रकाशक, लेखकांसाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करुन येणाऱ्या काळात पुस्तकांच्या गावी विविध साहित्यिकांचे महोत्सव आयोजित करुन मराठी भाषा दिन अधिक व्यापक प्रमाणात साजरा करण्याचा मानसही तावडे यांनी व्यक्त केला. 

चालत रहा, चालत रहा- राज्यपाल राम नाईक

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यावेळी म्हणाले की, मी मराठीत लिहिलेल्या ‘चरैवैती चरैवैती’ या पुस्तकाचा मराठीबरोबरच सहा भाषांमध्ये अनुवाद होत आहे. तर येत्या २६ मार्च रोजी या संस्कृत भाषेतील अनुवादित पुस्तकाचे राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘चरैवैती-चरैवैती’ या शब्दाचा अर्थ ‘चालत रहा, चालत रहा’ असा असून याप्रमाणे मी माझा लेखन प्रवास सुरु ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.


चार सर्वोच्च पुरस्कारांसह विविध वाड्ःमय पुरस्कार प्रदान

यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना,श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशन यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद संस्थेला आज मराठी भाषा गौरव दिनी प्रदान करण्यात आला. राज्यपाल राम नाईक, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्याशिवाय विविध साहित्य प्रकारांतील 35 राज्य वाड्:मय पुरस्कारदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात राहुल कोसंबी, ल.म.कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांचा सन्मानही करण्यात आला.

सन 2016 या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मिती स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारप्राप्त लेखक / साहित्यिकांची यादी

अ.क्र.

वाङमय प्रकार

पुरस्कार

रक्कम

लेखकाचे नाव

पुस्तकाचे नाव

प्रकाशन संस्था

1.  

प्रौढ वाङ्मय - काव्य

कवी केशवसूत पुरस्कार

रु.1,00,000/-

दिनकर मनवर

अजूनही बरंचकाही बाकी

पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई

2.  

प्रथम प्रकाशन-काव्य

बहिणाबाई चौधरी पुरस्कार

रु.50,000/-

अजित अभंग

गैबान्यावानाचं

पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई

3.  

प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिका

राम गणेश गडकरी पुरस्कार

रु.1,00,000/-

डॉ. आनंद नाडकर्णी

त्या तिघांची गोष्ट

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई

4.  

प्रथम प्रकाशन-नाटक/एकांकिका

विजय तेंडूलकर पुरस्कार

रु.50,000/-

प्रा.के.डी.वाघमारे

क्षितिजापलीकडे

निर्मल प्रकाशन, नांदेड

5.  

प्रौढ वाङ्मय - कादंबरी

हरी नारायण आपटे पुरस्कार

रु.1,00,000/-

सदानंद देशमुख

चारीमेरा

पॉप्युलर प्रकाशन, मुंबई

6.  

प्रथम प्रकाशन- कादंबरी

श्री.ना.पेंडसे पुरस्कार

रु.50,000/-

श्रीरंजन आवटे

सिंगल मिंगल

राजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे

7.  

प्रौढ वाङ्मय-लघुकथा

दिवाकर कृष्ण पुरस्कार


रु.1,00,000/-

नीलम माणगावे

निर्भया लढते आहे

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

8.  

प्रथम प्रकाशन - लघुकथा

ग.ल.ठोकळ पुरस्कार

रु.50,000/-

दुर्योधन अहिरे

जाणीव

यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे


9.  

प्रौढ वाङ्मय - ललितगद्य

(ललित विज्ञानासह)

अनंत काणेकर पुरस्कार

रु.1,00,000/-

विनायक पाटील

गेले लिहायचे राहून

राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे

10.  

प्रथम प्रकाशन - ललितगद्य

ताराबाई शिंदे पुरस्कार

रु.50,000/-

रश्मीकशेळकर

भुईरिंगण

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे

11.  

प्रौढ वाङ्मय - विनोद

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार

रु.1,00,000/-

बब्रूवान रुद्रकंठावार

आमादमी  विदाऊट पार्टी

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

12.  

प्रौढ वाङ्मय - चरित्र

न.चिं.केळकर पुरस्कार

रु.1,00,000/-

अरुण करमरकर

पोलादी राष्ट्रपुरुष

स्नेहल प्रकाशन, पुणे

13.  

प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्र

लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार

रु.1,00,000/-

राम नाईक

चरैवेति ! चरैवेति !!

इंकिंग इनोव्हेशन्स,मुंबई

14.  

प्रौढ वाङ्मय- समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन

श्री.के.क्षीरसागर पुरस्कार

रु.1,00,000/-

विश्राम गुप्ते

नवं जग, नवी कविता

संस्कृती प्रकाशन, पुणे

15.  

प्रथम प्रकाशन -                समीक्षा सौंदर्यशास्त्र

रा.भा.पाटणकर पुरस्कार

रु.50,000/-

बाळू दुगडूमवार

बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद

अभंग प्रकाशन, नांदेड

16.  

प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र/समाजशास्त्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

रु.1,00,000/-

आतिवास सविता

भय इथले...

तालिबानी सावट :

प्रत्यक्ष अनुभव

राजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे

17.  

प्रौढ वाङ्मय - इतिहास

शाहू महाराज पुरस्कार

रु.1,00,000/-

विजय आपटे

शोध महाराष्ट्राचा

राजहंस प्रकाशनप्रा. लि., पुणे

18.  

प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकरण

नरहर कुरूंदकर पुरस्कार

रु.1,00,000/-

तन्मय केळकर

मैत्री संस्कृतशी

रोहन प्रकाशन, पुणे

19.  

प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)

महात्मा जोतिराव फुले पुरस्कार

रु.1,00,000/-

डॉ.माधवी ठाकूरदेसाई

प्रकाशवेध


राजहंस प्रकाशन, पुणे

20.  

प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह

वसंतराव नाईक पुरस्कार

रु.1,00,000/-

प्रशांत नाईकवाडी

तांत्रिक दृष्टीकोनातून सेंद्रिय शेती

सकाळ पेपर्स प्रा.लि., पुणे

21.  

प्रौढ वाङ्मय -

दलित साहित्य

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार

रु.1,00,000/-

प्रा.डॉ.सुरेश चौथाईवाले

मातंग चळवळींचा इतिहास

लहुजी प्रकाशन, औरंगाबाद

22.  

प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन

सी.डी. देशमुख पुरस्कार

रु.1,00,000/-

अतुल कहाते

पैसा

मनोविकास प्रकाशन, पुणे

23.  

प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र

ना.गो.नांदापूरकर पुरस्कार

रु.1,00,000/-

डॉ.अनिल सहस्रबुद्धे

लोकनिष्ठ अध्यात्मवाद

पद्मगंधा प्रकाशन, पुणे

24.  प्रौढ वाङ्मय -  शिक्षणशास्त्र

कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

रु.1,00,000/-

डॉ.पुरुषोत्तम भापकर

हे शक्य आहे !

अवे मारिया पब्लिकेशन्स, पुणे

25.  प्रौढ वाङ्मय - पर्यावरण

डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार

रु.1,00,000/-

प्रा.पुंडलिक गवांदे

देतो तो निसर्ग,

घेतो तो मानव

दुर्वा एजन्सीज, पुणे

26.   प्रौढ वाङ्मय - संपादित/ आधारित

रा.ना.चव्हाण पुरस्कार

रु.1,00,000/-

संपादक

Web Title: Giving many different Marathi awards for Marathi language gaurav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.