राज्य शासनाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
By admin | Published: October 28, 2016 01:45 AM2016-10-28T01:45:50+5:302016-10-28T01:45:50+5:30
राज्य शासनाच्या विविध वाड्.मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात प्रभा गणोरकर, रामदास भटकळ, सुहास बहुळकर, प्रेमानंद गज्वी, राजीव तांबे, प्रतिमा
मुंबई : राज्य शासनाच्या विविध वाड्.मय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यात प्रभा गणोरकर, रामदास भटकळ, सुहास बहुळकर, प्रेमानंद गज्वी, राजीव तांबे, प्रतिमा इंगोले यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिकांना पुरस्कार घोषित झाले आहेत.
पुरस्काराचे स्वरुप जास्तीत जास्त एक लाख रुपये आणि कमीत कमी ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
पुरस्कार, त्याचे विजेते आणि त्यांच्या साहित्यकृती अशा - : प्रौढ वाड्.मय ( काव्य) ; कवि केशवसूत पुरस्कार - प्रभा गणोरकर (व्यामोह), प्रथम प्रकाशन (काव्य); बहिणाबाई चौधरी पुरस्कार - इग्नेशिअस डायस (अधांतराला लटकलेल्या आवरणात), नाटक ; राम गणेश गडकरी पुरस्कार - रमेश नाईक (ती एक अहिल्या होती), कादंबरी; हरी नारायण आपटे पुरस्कार - बा.भो.शास्री (झांजर), प्रथम प्रकाशन कादंबरी; श्री.ना.पेंडसे पुरस्कार - नितीन थोरात (सूर्याची सावली), लघुकथा; दिवाकर कृष्ण पुरस्कार - प्रकाश बाळ जोशी (प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा), प्रथम प्रकाशन लघुकथा; ग.ल.ठोकळ पुरस्कार - ऋषिकेश वांगीकर (कथास्तु), ललितगद्य; अनंत काणे पुरस्कार - प्रेमानंद गज्वी (सगुण नगुण), प्रथम पुरस्कार ललितगद्य; ताराबाई शिंदे पुरस्कार - संदेश कुलकर्णी (माँटुकल दिवस).
विनोद; श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार - प्रतिमा इंगोले (हॅट्ट्रिक), चरित्र; न.चिं.केळकर पुरस्कार - सुहास बहुलकर (आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर, आत्मचरित्र; लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - डॉ.ऊज्ज्वला सहाणे (प्रेरणा द साऊंड आॅफ सायलेन्स...), समीक्षा/ वाड्.मयीन संशोधन/ सौंदर्यशास्र; श्री.के. क्षीरसागर पुरस्कार - सुधीर रसाळ (मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण), समीक्षा सौंदर्यशास्र; रा.भा.पाटणकर पुरस्कार - राजेंद्र सलालकर (रंगनाथ पठारे यांच्या साहित्यातील स्री दर्शन), राज्यशास्र/समाजशास्र; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - रमेश पतंगे (सामाजिक न्याय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर), इतिहास; शाहू महाराज पुरस्कार - संजीवनी खेर (सर्वसाक्षी), भाषाशास्र/ व्याकरण; नरहर कुरुंदकर पुरस्कार - रामदास भटकळ, मृदुला प्रभुराम जोशी (पॉप्युलर रीतिपुस्तक), विज्ञान व तंत्रज्ञान; महात्मा जोतिराव फुले पुरस्कार - रमेश वरखेडे (सायबर-संस्कृती), शेती व शेतीविषयकपूरक व्यवसाय लेखनासह; वसंतराव नाईक पुरस्कार - डॉ.नितीन मार्कण्डेय (सातत्यपूर्ण आणि भरपूर दुधासाठी माज संकलन तंत्र).
अर्थशास्र व अर्थशास्रविषयक लेखन; सी.डी.देशमुख पुरस्कार - डॉ.श्रीराम पेडगावकर (मानवी अर्थशास्र), तत्त्वज्ञान व मानसशास्र; ना.गो.नांदपूरकर पुरस्कार - दिलीप धोंडगे (तात्पर्य). (विशेष प्रतिनिधी)