लोकसभेत ‘मिनी इंडिया’ची झलक; घडले विविधतेत एकतेचे दर्शन

By Admin | Published: June 5, 2014 11:47 PM2014-06-05T23:47:28+5:302014-06-05T23:47:28+5:30

सोळाव्या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेत असताना मिनी इंडियाची झलक दिसली.

A glimpse of 'Mini India' in Lok Sabha; Unity in Diversity Due to Due | लोकसभेत ‘मिनी इंडिया’ची झलक; घडले विविधतेत एकतेचे दर्शन

लोकसभेत ‘मिनी इंडिया’ची झलक; घडले विविधतेत एकतेचे दर्शन

googlenewsNext
>नवी दिल्ली : सोळाव्या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेत असताना मिनी इंडियाची झलक दिसली. पहिल्यांदाच निवडून आलेल्या देशाच्या कानाकोप:यातील खासदारांमध्ये अतिशय उत्साह दिसून आला. हिंदी, संस्कृत आणि  मायबोलीतून शपथ घेणा:या खासदारांनी पारंपरिक वेश आणि मातृभाषेच्या वैविध्यासोबतच एकतेचे दर्शन घडविले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. मोदी यांच्यानंतर रालोआचे कार्यकारी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी, संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शपथ घेतली. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळ सदस्यांनी शपथ घेतली. मोदी आणि अडवाणींनी ईश्वराला स्मरत तर सोनियांनी सत्यनिष्ठेच्या नावावर शपथ घेतली. सभागृहात उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: पहिल्यांदाच निवडून आलेल्या 3क्क् वर खासदारांनी उत्साह दाखविला. रंगीबेरंगी पेहराव, पगडी, डोक्यावरील टोप्या आणि फेटय़ांमधूनही प्रादेशिक अस्मिता झळकत होती. 25 वर्षातील आघाडी सरकारचे युग जाऊन भाजपाने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळविल्याने सभागृहातील चित्र पूर्णपणो पालटले आहे.  
पांढरा कुर्ता, चुडीदार पायजमा आणि जवाहर कट, काळी सँडल आणि खिशाला काळा पेन अशा वेशात मोदी सभागृहात आले होते. त्यांनी शपथ घेतल्यानंतर सत्ताधारी आणि सोनिया गांधींसह विरोधकांनी बाके वाजवून स्वागत केले. शपथ घेतल्यानंतर सर्व खासदार एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत होते.
राजीनामे स्वीकारले
लोकसभेचे हंगामी अध्यक्ष कमलनाथ यांनी नरेंद्र मोदी- बडोदा, मुलायमसिंग यादव- मैनपुरी, के.चंद्रशेखर राव- तेलंगण यांचे राजीनामे 29 मे 14 पासून स्वीकृत करण्यात आल्याची घोषणा केली.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
दानवेंचा मराठी बाणा
4गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या वाटय़ाचे एक मंत्रिपद कमी झाले आहे. नितीन गडकरी यांनी हिंदीतून तर रावसाहेब दानवे यांनी मराठी बाणा दाखवत मराठीतून शपथ घेतली. शिवसेनेचे अनंत गिते यांच्याकडून मराठीतून शपथेची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी हिंदीतूनच शपथ घेतली.
 
पारंपरिक वेशात मायबोलीतून घेतली शपथ..
डोक्यावर खास फेटा बांधून आलेल्या एका खासदाराने सभागृहात प्रवेश करण्याआधी नृत्य करीत लक्ष वेधले.
भोजपुरी गायक मनोज तिवारी यांनी कागद न वाचताच शपथ घेत टाळ्या मिळविल्या.
राजस्थानी, गुजराती पगडय़ांसह अन्य राज्यांच्या पगडय़ांनी माहोल रंगीबेरंगी केला होता.
मैथिली, आसामी, गुजराती, कन्नड, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमधून शपथ घेतली गेली.
बिहारचे खासदार, माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी पारंपरिक मैथिली वेश आणि पगडी परिधान केली होती.
पुत्र चिराग शपथ घेत असताना रामविलास पासवान यांनी बाक वाजवून आनंद व्यक्त केला.
लोजपाच्या वीणादेवी यांनी चष्मा आणला नव्हता. त्यांनी लोकसभा कर्मचा:याचा चष्मा मागत शपथ वाचली.
 
संस्कृतमधूनही शपथ
काही मंत्र्यानी संस्कृतमधून शपथ घेतली. सुषमा स्वराज, उमा भारती, हर्षवर्धन यांच्यासह दिल्लीच्या तीन खासदारांचा त्यात समावेश होता. डी.वी. सदानंद गौडा, अनंत कुमार, जी.एम. सिद्धेश्वर यांनी कन्नड तर सर्बानंद सोनोवाल यांनी आसामी, जुएल ओराम यांनी उडियामधून, हरसिमरतकौर बादल यांनी पंजाबीतून शपथ घेतली. 
 

Web Title: A glimpse of 'Mini India' in Lok Sabha; Unity in Diversity Due to Due

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.