विदर्भ राज्य परिषदेत ‘लोकमत’चा गौरवपूर्ण उल्लेख!
By admin | Published: April 20, 2016 10:36 PM2016-04-20T22:36:56+5:302016-04-20T22:56:55+5:30
स्वतंत्र विदर्भाची निर्मिती झाल्यास हिंदी भाषिकांचे राज्य येईल, असा गैरसमज स्वतंत्र विदर्भाच्या विरोधकांकडून पसरविला जातो; मात्र प्रत्यक्षात विदर्भात मराठी -हिंदी भाषावाद अजिबात नाही
Next
>स्वतंत्र विदर्भाची निर्मिती झाल्यास हिंदी भाषिकांचे राज्य येईल, असा गैरसमज स्वतंत्र विदर्भाच्या विरोधकांकडून पसरविला जातो; मात्र प्रत्यक्षात विदर्भात मराठी -हिंदी भाषावाद अजिबात नाही, हे स्पष्ट करताना, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी लोकमतचा गौरवपूर्ण उल्लेख केला. लोकनायक बापुसाहेब अणे यांनी सुरू केलेल्या ‘लोकमत’ वृत्तपत्राची धुरा स्व. जवाहरलाल दर्डा यांनी सांभाळली. एका हिंदी भाषिकाने चालवलेले हे वृत्तपत्र आज मराठी भाषिकांचे अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आले, असे अॅड. अणे यावेळी म्हणाले. मुळात विदर्भात हा भाषावादच नाही. वैदर्भियांनी या दोन्ही भाषा अगदी सहजतेने स्वीकारल्या आहेत, असे अणे यांनी सांगितले.