‘लोकमत’ पुरस्काराने दिग्गजांचा गौरव

By admin | Published: July 6, 2014 02:09 AM2014-07-06T02:09:21+5:302014-07-06T02:09:21+5:30

रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रंतील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणत त्यांच्या कर्तृत्वाला सोनेरी क्षणांची झळाळी देण्यात आली.

Glory of the 'Lokmat' award | ‘लोकमत’ पुरस्काराने दिग्गजांचा गौरव

‘लोकमत’ पुरस्काराने दिग्गजांचा गौरव

Next
मुंबई : एचआर, बँकिंग, फायनान्शियल, सव्र्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स, रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रंतील दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणत त्यांच्या कर्तृत्वाला सोनेरी क्षणांची झळाळी देण्यात आली. निमित्त होते ते वांद्रे येथील ताज लँड्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘लोकमत पुरस्कार’ सोहळ्याचे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक बाजारपेठांमध्ये कमालीची उलाढाल होत असतानाच चांद्यापासून बांद्यार्पयत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीर्पयत या क्षेत्रत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा:या दिग्गजांना ‘लोकमत’ने पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आणले. आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील कर्तृत्ववान व्यावसायिकांना या वेळी गौरविण्यात आले. 
 
प्रशासकीय स्तरासह देशातील नामांकित व्यावसायिकांनी या पुरस्कर सोहळ्याची दखल घेतल्यानंतर भविष्यातही अशाच पुरस्कार सोहळ्यांच्या माध्यमांतून उद्योजकांना सन्मानित करण्यात येईल, असा विश्वास या वेळी ‘लोकमत’चे सह उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी व्यक्त केला. या पुरस्कार सोहळ्याला गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष अॅड. युसूफ अब्राहनी, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ‘लोकमत’च्या जाहिरात विभागाचे उपाध्यक्ष करुण गेरा, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक विनायक पात्रुडकर आणि डॉ. आर. एल. भाटीया यांच्यासह उद्योग क्षेत्रतील विविध मान्यवर उपस्थित होते. पहिल्या सत्रत अॅस्पायर एचआर लीडरशिप पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा सोहळा पटेल ग्रुप अँड कं. डेव्हलपर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, रिजन्सी ग्रुप, सिद्धीटेक होम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नातू परांजपे रिअॅल्टर्स यांच्या सहयोगाने पार पडला. दुस:या सत्रत बीएफएसआय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्य़ाचे पटेल ग्रुप अॅण्ड कं. डेव्हलपर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रस्तुतकर्ते होते. हा सोहळा रिजन्सी ग्रुप यांच्या सहयोगाने पार पडला. सिद्धीटेक होम्स प्रा. लि., नातू परांजपे रिअॅल्टर्स आणि वास्तुरविराज हे सोहळ्याचे सहयोगी प्रायोजक होते. तिस:या सत्रत रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे सहयोगी प्रायोजक वास्तुरविराज होते. 
एचआर लीडरशिप अॅवॉर्ड
‘लोकमत अॅस्पायर एचआर लीडरशिप अॅवॉर्ड्स 2क्14’ या पुरस्कार सोहळ्यांतर्गत मदर डेअरी फ्रूट अॅण्ड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड एचआर आणि चिफ पीपल ऑफिसर अॅण्ड ग्रुप हेड डॉ. सौगता मित्र यांना ‘एचआर प्रोफेशनल ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. अनुप कुमार मित्तल यांना ‘सीईओ ऑफ दी इयर’ने सन्मानित करण्यात आले. सेरको ग्लोबल सव्र्हिसेसच्या कॉर्पोरेट ग्लोबल एचआरचे उपाध्यक्ष केवीन केनिथ यांना ‘अॅवॉर्ड फॉर बेस्ट एचआर लीडर’ने सन्मानित करण्यात आले. ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड एचआर विभागाचे संचालक के. एस. ज्ॉमेस्टीन यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे संचालक मनोज मिश्र यांना ‘एचआर अचिव्हर ऑफ दी इयर’ने सन्मानित करण्यात आले. मेट्रो शोज लिमिटेड आणि टाटा बिझनेस सर्पोट सव्र्हिस लिमिटेडला ‘बेस्ट एचआर प्रॅक्टिसेस अॅवॉर्ड इन रिवॉर्ड अॅण्ड रेकग्नायङोशन स्ट्रॅटेजिक’ने सन्मानित करण्यात आले. नारायण इंजिनीअरिंग कॉलेजला ‘इन्स्टिटय़ूट विथ एक्सलंट इंडस्ट्री इंटरफेस’ने सन्मानित करण्यात आले. येस बँक लिमिटेडला ‘एचआर कंपनी ऑफ दी डिकेड’ने सन्मानित करण्यात आले. येस बँक लिमिटेडला ‘लीडिंग पार्टीज इन लर्निग अॅण्ड ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट’ने सन्मानित करण्यात आले. येस बँक लिमिटेडला ‘दी अॅवॉर्ड फॉर दी बेस्ट लर्निग अॅण्ड डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजिक’ने सन्मानित करण्यात आले. ‘एचआर लीडरशिप अॅवॉर्ड’ने ब्रॉडब्रिज फायनान्शियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटडच्या ह्युमन रिसोर्स विभागाच्या मुख्य रजिता सिंह, बीएसई लिमिटेडच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे मुख्य श्रीराम दारभा, आयडीबीआय फेडरल लाइन इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चिफ पीपल ऑफिसर अजय ओबेरॉय, एमएसडी/मेर्कच्या एचआर लीडर पूजा मिनोचा, लार्सन अॅण्ड टुब्रोचे उपाध्यक्ष डी. सी. मंडलीक, टेक सोल्युशनच्या उपाध्यक्षा सूचेता शेट्टी, सायेंट लिमिटेडचे अध्यक्ष अशोक रेड्डी, पिगियो व्हेकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष मंगेश कुलकर्णी, डेलॉइट कन्सल्युटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक एस. व्ही. नाथन, अॅप्टेक लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष शौर्या चक्रवर्ती, डाटामॅटिक्स ग्लोबल सव्र्हिस लिमिटेडचे 
अध्यक्ष डॉ. चंद्रा माऊली द्विवेदी, अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्रायङोस लिमिटेडचे चिफ पीपल ऑफिसर जेकॉब, इंजिनीअर्स इंडिया लिमिटेडचे ह्युमन रिसोर्सच्या संचालिका वीणा स्वरूप, लॅण्डमार्क ग्रुपचे अध्यक्ष बी. वेंकटरमण, एबीजी ग्रुपचे अध्यक्ष एस. के. दत्त, टाटा कन्सलटन्सी सव्र्हिसेस महाव्यवस्थापक राजीव नॉरोन्हा, जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष संजीव साही, लार्सन अॅण्ड टुब्रो इन्फोटेक लिमिटेडच्या एचआर विभागाचे मुख्य अजॉय साळवे, ग्लोबल एचआर अॅण्ड कॉर्पोरेट अफेअर्स, 
युफेलक्स लिमिटेडचे कार्यकारी सह अध्यक्ष 
चंदन चटर्जी, अदानी ग्रुपचे अध्यक्ष पी़ क़े पांडा, सिरओ ग्लोबल सव्र्हिसचे मॅन्युल डिसोझा, एनटीटी डाटाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बी. श्रीनिवाससुलू, ऑट्स इंडियाचे संचालक कृष्णा किशोरे, कॅम्पास रिलेशनशिप्सच्या इंडिया हेड रेखा मॅथ्युस, एबीएन ऑफशोर लिमिटेडचे उपाध्यक्ष विनोद पिल्लाई, एटीसी टॉवर कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर हेड मुरलीधर श्याम, जे. के. टायर अॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष विजय देशपांडे, विरुत्सू कन्सल्टिंगचे वरिष्ठ संचालक डॉ. मुरली पद्मनाभन, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिजचे वरिष्ठ संचालक डॉ. अभय श्रीवास्तव, यात्र ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर विभागाचे मुख्य प्रयाग कुमार, इग्रेसॉलरँड लिमिटेडचे मनीष मदान आणि एनआयआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या चिफ पीपल ऑफिसर 
रसिता रवींद्र यांना गौरविण्यात आले.
 
रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अॅवॉर्ड्स
टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रोटीन बॅनर्जी, एव्हरशाइन बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद लुधानी, पॅसिफिक इस्टेटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज निहलानी, रहेजा युनिव्हर्सल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशिष रहेजा, मनी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय झुनझुनवाला, कोहिनूर ग्रुपचे संचालक विनीत गोयल आणि बियाँड स्केअरफिटचे संस्थापक सुशील डुंगरवाला यांना ‘रिअल इस्टेट लीडरशिप अॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले.
एल अॅण्ड टी रिअॅलिटी लिमिटेडच्या उप महाव्यवस्थापक समिरा तपिया, एक्सआयबिया डेव्हलपर्स सह उपाध्यक्षा स्मिता लोबो, सेकास्पेस अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरच्या सीओओ रंजिता चटर्जी, स्क्वेअर नाइन डिझाइनच्या व्यवस्थापकीय संचालिका शेरा बानो कमल, अविघ्न इंडिया लिमिटेडच्या विपणन विभागाच्या मुख्य शालिनी दीक्षित, रोहन लाइफ स्पेस लिमिटेडच्या विपणन विभागाच्या संचालिका अनन्या कामिनी, सीआरआयएसआयएल लिमिटेडच्या संचालिका बेनिहर जेहानी आणि गोदरेज प्रॉपर्टीजच्या महाव्यवस्थापक सुनैना कोहली यांना ‘वूमन सुपर अचिव्हर अॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले. एएलए कॉनसिग्रे सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक चैतन्य सिंह आणि जॉन्स लाँग्लासलेचे व्यवस्थापकीय संचालक यश कपिल यांना ‘फॅकल्टी मॅनेजमेंट अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. 
एसीएमई ग्रुपचे विक्री आणि विपणन विभागाचे मुख्य श्याम नाम्बियार, कोलते पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष महेश सळूज, हिरानंदानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालक प्रकाश शाह, लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्री आणि विपणन विभागाचे मुख्य हमीद ख्वाजा, फॅल्को डेव्हलपर्सचे संचालक रोहित चुगानी, अशिना हाऊसिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष विजय मोहन, कोहिनूर प्लॅनेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या कोहिनूर सिटी प्रोजेक्टचे मुख्य अतुल मोडक, लोटस ग्रीन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक ब्रिजेश भानोटे, हॅप्पी होम्स प्रोजेक्ट्स सीएमओ विनोद मनवाणी यांना ‘मोस्ट टॅलेन्टेड मार्केटिंग प्रोफेशनल’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पंचशील रिअॅलिटीला ‘रिअल इस्टेट कंपनी ऑफ दी इयर’, रिजन्सी निर्माण लिमिटेडला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोजेक्ट ऑफ दी इयर’, पटेल ग्रुप अॅण्ड को. यांना ‘डेव्हलपर ऑफ दी इयर’, सिद्धीटेक होम्स प्रायव्हेट लिमिटेडला ‘इमजिर्ग रिअल इस्टेट ऑर्गनायङोशन ऑफ दी इयर’, अजमेरा रिअॅलिटी अॅण्ड इन्फ्रा इंडिया लिमिटेडला ‘प्रेस्टिजिअस रेसिडेन्शियल प्रॉपर्टी ऑफ दी इयर’, नातू परांजपे रिअॅल्टर्स यांना ‘लक्झरी प्रोजेक्ट ऑफ दी इयर’, सारथी ग्रुपचे अध्यक्ष अभिजित शेंडे, सनटेक रिअॅलिटी लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कमल खेतान, कुमार डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक कृती जैन यांना ‘यंग अचिव्हर्स पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. 
मंत्री रिअॅलिटी लिमिटेडचे संचालक सरिता मंत्री यांना ‘वूमन कॉन्ट्रिब्युशन टू दी रिअल इस्टेट इंडस्ट्री’, अशोका बिल्डकॉन लिमिटेडला ‘एक्सलन्स इन इन्फ्रास्ट्रक्चर’, ऑलिम्पिया ग्रुपला ‘लेस्युर अॅण्ड इंटरटेन्टमेंट प्रोजेक्ट ऑफ दी इयर’, सनटेक रिअॅलिटी लिमिटेडला ‘लक्झरी प्रोजेक्ट ऑफ दी इयर’, जी:क्रॉप होम्स प्रायव्हेट लिमिटेडला ‘रेसिडेन्शियल प्रॉपर्टी ऑफ दी इयर’, व्हॅल्यू अॅण्ड बजेट हाऊसिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडला ‘अफोर्डेबल हाऊसिंग आफ द इयर’, सोहर ग्रुपला ‘एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट 
ऑफ दी इयर’, टाटा हाऊसिंग डेव्हल्पमेंट 
कंपनी लिमिटेडला ‘रिअल इस्टेट प्रोजेक्ट 
ऑफ दी इयर’, शेठ डेव्हलपर्स अॅण्ड रिअॅल्टर्स लिमिटेडला ‘इमजिर्ग डेव्हलपर ऑफ दी इयर’, रेडिफिक डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ‘डेव्हलपर ऑफ दी इयर’, टाइम्स बिझनेस सोल्युशन लिमिटेडला ‘मोस्ट अॅडमायर रिअल इस्टेट वेबसाइट ऑफ दी इयर’ आणि एल अॅण्ड टी रिअॅलिटी लिमिटेडला ‘रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ दी इयर’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
 
बँकिंग, फायनान्शियल, सव्र्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स अॅवॉर्ड्स
इंडिया ओव्हरसिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष एम. नरेंद्र, कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आर. के. दुबे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येस बँक लिमिटडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ‘व्हिजनरी लीडरशिप अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. 
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना ‘सीईओ ऑफ दी इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. टांकसळे, टाटा कॅपिटल व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पी. कडळे, दी न्यू इंडिया एश्युरन्स कंपनी लिमिटडचे व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीनिवासन यांना ‘आऊट स्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टू द इंडस्ट्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडचे सहउपाध्यक्ष अंथसुब्रमणियन मूर्ती, आयडीबीआय फेडरल लाइन इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य अनिश खन्ना, एसआरईआयचे उपाध्यक्ष संजय भट्टचर्जी, मुथ्थू फायनान्ससचे मुख्य विपणन अधिकारी चेरिज पेटर यांना ‘मोस्ट टॅलेन्टेंड मार्केटिंग प्रोफेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेडचे सह उपाध्यक्ष विनीत कुमार, मॅग्मा फिनक्रॉप लिमिटेडचे सह उपाध्यक्ष सूर्यकांत मिश्र, डेस्टिमनी सिक्युरिटीजचे मुख्य विपणन अधिकारी झाहीद गवांदी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक विनोद पांडे, डीसीबी बँक लिमिटेडचे गौरव मेहता, जियोजित बीएनपीच्या वरिष्ठ व्यवस्थापक एलिझाबेथ यांना कॉर्पोरेट कम्युनिकेशन लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसिज बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रतील बँकांना ‘बेस्ट बँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येस बँक लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक लिमिटेड या खासगी क्षेत्रतील बँकांना ‘बेस्ट बँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभ्युदय को-ऑपरेटिव्ह आणि दी शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी क्षेत्रतील बँकांना ‘बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी सातारा डिस्ट्रिक सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना ‘बेस्ट डिस्ट्रिक सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अॅक्सिस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय  प्य्रुडेंशियल असेट मॅनेजमेंट कंपनी, फ्रँकलिन टेम्प्लेटॉन असेट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेड लिमिटेड यांना ‘बेस्ट असेट मॅनेजमेंट कंपनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना ‘बेस्ट जनरल इन्शुरन्स कंपनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बिरला सनलाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज अलियान्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या खासगी क्षेत्रतील कंपन्यांना ‘बेस्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रतील विमा कंपनीला ‘बेस्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला ‘स्पेशल अॅवॉर्ड फॉर इन्करेजिंग एसएमई, लिबर्टी व्हिडीओकॉन जनरल इन्शुरन्स को. लिमिटेडला ‘बेस्ट इमजिर्ग ऑर्गनायङोशन इन बीएफएसआय’, आयडीबीआय बँक लिमिटेडला ‘बेस्ट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रॅक्टिसेस’, आयडीबीआय बँक लिमिटेडला ‘बँक विथ लीडिंग फायनान्शियल इन्क्लुजन इन्व्हायटीज’, स्टेट बँक ऑफ इंडियाला ‘मॅक्सिमम एटीएम डिफरन्ट लोकेशन्स’, वानांचल ग्रामीण बँकेला ‘इनोटिव्ह इन रुरल सेक्टर’, बँक ऑफ महाराष्ट्राला ‘बँक विथ मोस्ट अॅडमिअर सव्र्हिसेस’, बँक ऑफ महाराष्ट्रला ‘बँक विथ कस्टमर ऑरिएंटेशन’, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ‘कंपनी विथ हायस्ट क्लेम सेटलमेंट’ आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ‘अंडरवेटिंग इन्व्हायटीज ऑफ दी इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
‘लोकमत’चा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विविध क्षेत्रंतील दिग्गजांचा ‘लोकमत’ने गौरव केला आहे. त्यामुळे त्यांनाही पुढील कामगिरीसाठी हुरूप येईल. विशेषत: बांधकाम क्षेत्रतील व्यावसायिकांचा गौरव करून ‘लोकमत’ने त्यांना एका अर्थाने व्यासपीठ दिले आहे. ‘लोकमत’च्या पुढील वाटचालीसाठी माङयाकडून शुभेच्छा़
- सचिन अहीर, गृहनिर्माण राज्यमंत्री
 
एचआर, बँकिंग, फायनान्शियल, सव्र्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स आणि रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रतील दिग्गजांना एकाचवेळी व्यासपीठावर आणणो खरेतर जिकिरीचे काम. परंतु ‘लोकमत’ने त्यांना एकाच व्यासपीठावर आणत त्यांचा गौरव केला, ही बाब कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. महत्त्वाचे म्हणजे बांधकाम क्षेत्रतील व्यावसायिकांनी आता सर्वसामान्यांना परवडणारी घरे कशी उपलब्ध होतील, याकडे लक्ष केंद्रित करणो गरजेचे असून, ‘लोकमत’ला पुढील वाटचालीसाठी माङयाकडून शुभेच्छा़
- अॅड. युसूफ अब्राहनी, 
अध्यक्ष, मुंबई मंडळ, म्हाडा 
 
बँकिंग, फायनान्शियल, सव्र्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स म्हणजे आर्थिक क्षेत्रची जीवनवाहिनी आहेत. एकीकडे उद्योग भरारी घेताना या क्षेत्रंना गौरविणो म्हणजे एका अर्थाने त्यांना प्रोत्साहित करण्यासारखे आहे. ‘लोकमत’ने या क्षेत्रतील दिग्गजांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले असून, देशाच्या विकासासाठी या क्षेत्रवर भर देणो गरजेचे आह़े असे केले तरच आर्थिक क्षेत्र मागासलेले राहणार नाही.
- मोहन टंकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, इंडियन बँक असोसिएशन
 
‘लोकमत पुरस्कार’ सोहळ्याने उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले आहे. उद्योगधंद्यांचा आणि येथील मार्केटचा सद्य:स्थितीचा विचार करता ‘लोकमत’ने एचआर व बँकिंग, फायनान्शियल, सव्र्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स क्षेत्रतील दिग्गजांना गौरविणो म्हणजे खरेच कौतुकास्पद आहे. ‘लोकमत’ला पुढील वाटचालीसाठी माङया शुभेच्छा़ 
- संजय मुथाल, व्यवस्थापकीय 
संचालक, आरजीएफ
 
‘लोकमतचा पुरस्कार सोहळा’ शानदार होता. एकाचवेळी विविध क्षेत्रंतील दिग्गजांचा गौरव करून ‘लोकमत’ने त्यांना प्रोत्साहित केले आहे. भविष्यात हा सोहळा आणखी शानदार होईल, अशी अपेक्षा असून उर्वरित क्षेत्रंतील दिग्गजांनाही ‘लोकमत’च्या वतीने पुढील सोहळ्यादरम्यान गौरविण्यात येईल, अशी आशा आहे.
- हसमुख पटेल, व्यवस्थापकीय 
संचालक, पटेल ग्रुप
 
‘लोकमत’ पुरस्कार सोहळा अविस्मरणीय होता. उद्योग क्षेत्रतील नामवंतांना पुरस्कार सोहळ्यादरम्यान गौरविण्यात आले. यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल.
- महेश अग्रवाल, मुख्य 
व्यवस्थापकीय संचालक, रिजन्सी ग्रुप
 
‘लोकमत पुरस्कार सोहळा’ कौतुकास्पद होता. पुरस्कार सोहळ्याचे व्यवस्थापन चोख करण्यात आले होते. प्रतिष्ठित नागरिक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. ‘लोकमत’ने दिग्गजांना गौरविल्याने आता त्यांना प्रोत्साहन मिळेल.
- हेमंत अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, सिद्धीटेक
 
‘लोकमत’सारख्या मीडियाकडून व्यावसायिकांचा करण्यात आलेला गौरव निश्चितच कौतुकास्पद आहे. सद्य:स्थितीचा विचार करता रिअल इस्टेट क्षेत्रत परवडणा:या घरांना मागणी आहे. मात्र मुंबईसारख्या शहरात परवडणारी घरे बांधणो शक्य नाही. त्यामुळे अवास्तव अपेक्षा बाळगणो चुकीचे आहे. कारण रिअल इस्टेटचे मार्केट डाऊन आहे. परंतु मुंबईबाहेर म्हणजे ठाणो आणि नवी मुंबई क्षेत्रत परवडणारी घरे बांधणो शक्य आहे. आणि सरकारने यात हस्तक्षेप केला, इच्छाशक्ती बाळगली तर रिअल इस्टेट मार्केट पुन्हा ङोपावेल. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी विकासक बांधकाम करताना वास्तुशास्त्रचा आधार घेत नव्हते. मात्र आता नागरिकांकडूनच ही मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे विकासक बांधकाम करताना वास्तुशास्त्रचा आधार घेत आहेत.
- डॉ. रविराज अहिरराव, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, वास्तुरविराज
 
‘लोकमत’चा पुरस्कार सोहळा कौतुकास्पद होता. ‘लोकमत’ने विविध क्षेत्रतील दिग्गजांना गौरवत त्यांना प्रोत्साहित केले आहे. पुढील वर्षी या सोहळ्यामध्ये उर्वरित क्षेत्रंतील दिग्गजांनाही गौरविण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
- समीर नातू, व्यवस्थापकीय संचालक, नातू परांजपे रिअॅल्टर्स 
 

 

Web Title: Glory of the 'Lokmat' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.