गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

By Admin | Published: September 22, 2016 06:58 PM2016-09-22T18:58:39+5:302016-09-22T18:58:39+5:30

गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला आहे.

Go Goa- Travel to Mumbai in six hours | गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

गोवा- मुंबई प्रवास होणार सहा तासांत

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २२ : गोव्यात रस्ते, महामार्ग, पुल, बंदरे, नद्या उसपणो, जलमार्गाचा विकास अशा अनेक प्रकल्पांसाठी एकूण वीस हजार कोटींचा निधी केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे जाहीर केला. येत्या दोन वर्षात हा निधी खर्च केला जाईल. तसेच गोवा-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण व चौपदरीकरण केले जाणार असून त्यामुळे गोमंतकीय सहा तासांत मुंबईस पोहचू शकतील, असे गडकरी म्हणाले.

मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) आणि गोवा सी-पोर्ट प्रा. लिमिटेड यांच्यात गुरुवारी करारावर सही झाली. एमपीटीच्या आठ व नऊ क्रमांकाच्या धक्क्याच्या फेरविकासासाठी हा करार आहे. 1 हजार 145.36 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर येणार आहे. एमपीटीसाठी 2क्क् केव्ही क्षमतेच्या सौरउज्रेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा मिरामार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, वीज मंत्री मिलिंद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, एमपीटीचे चेअरमन आय.जे. कुमार, सी-पोर्ट कंपनीचे संचालक अशोक कुमार, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव आदी व्यासपीठावर होते.

गोव्यात महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आठ किलोमीटरचा नवा महामार्ग बांधला जाईल. गोव्यात नवे बंदर उभे केले जाईल. मांडवी व जुवारी या दोन नद्या 31 ठिकाणी उसपल्या जातील. जलमार्ग यामुळे विकसित होतील व त्याचा लाभ गोव्याला होईल. एमपीटीने समुद्र उसपून बंदराची खोली 14 मीटरवरून 19 मीटरपेक्षा जास्त करण्याचे ठरविले आहे, असे गडकरी यांनी सांगितले. एकूण वीस हजार कोटी रुपये आम्ही गोव्यासाठी खर्च करू. काही कामांसाठी गोवा सरकारकडून आम्हाला अजुन परवानगीची गरज आहे, असेही ते म्हणाले. गोव्याची वाहतूक हरित पद्धतीने व्हायला हवी. त्यासाठी सीएनजीचा वापर वाढावा म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करील.

गोव्यातील अपघातांच्या जागा सरकारने शोधून काढाव्यात. त्यावर उपाय काढण्यासाठी आम्ही निधी देऊ, असे गडकरी यांनी सांगितले. गोव्यातील बंदरांच्या विकासामुळे मच्छीमारांनी घाबरण्याचे कारण नाही. त्यांनाही अर्थसाह्य करू व त्यामुळे ते 12 सागरी मैलांच्याही पलिकडे जाऊन मासेमारी करू शकतील. वास्को शहर व एमपीटीमध्ये जो वाद आहे, त्यावर योग्य तोडगा काढू. मच्छीमारांचे हित आम्ही जपू. गोव्यात जेटींचा विकास करू, असे गडकरी यांनी जाहीर केले.

मुंबईस पोहचा सहा तासांत
गोवा- मुंबई महामार्गाचे चौपदीकरण केले जाणार आहे. पूर्ण काँक्रिटचा हा महामार्ग होईल. त्यामुळे वाहतुकीतील वेळ खूपच कमी होईल व गोमंतकीयांना सहा तासांत मुंबई गाठता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. जलमार्ग, बंदरे व किनारपट्टी विकासासाठी देशभर सागरमाला प्रकल्प राबविला जाणार आहे. एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक त्यानिमित्ताने सागरी राज्यांमध्ये होईल. देशात सध्या दिवसाला आम्ही 22 किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करत आहोत.

यापुढे 42 किलोमीटर प्रती दिन काम करण्याचे लक्ष्य आहे, असे गडकरी यांनी सांगितले. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर गोव्यात उभा करण्याचे सूतोवाचही गडकरी यांनी केले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गडकरी यांच्या कामाच्या वेगाची स्तुती केली. गडकरी यांच्यामुळे गोव्याला खूप लाभ होत आहे. जुवारी नदीवर नवा पुल यापुढे साकारणार आहे. पुलामुळे बांबोळीपासून वेर्णार्पयत नवे रस्ते अस्तित्वात येतील. पुलापेक्षाही जास्त खर्च या रस्त्यांच्या कामावर केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Go Goa- Travel to Mumbai in six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.