गोव्याचे संघचालक वेलिंगकरना हटविले

By Admin | Published: August 31, 2016 02:22 PM2016-08-31T14:22:47+5:302016-08-31T14:22:47+5:30

शिक्षणाच्या माध्यम प्रश्नावरून भारतीय भाषा मंचाच्या बँनरखाली भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलेले गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना संघचालक पदावरून हटविण्यात आले.

Goa federator Welingkar deleted | गोव्याचे संघचालक वेलिंगकरना हटविले

गोव्याचे संघचालक वेलिंगकरना हटविले

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३१ -  शिक्षणाच्या माध्यम प्रश्नावरून भारतीय भाषा मंचाच्या बँनरखाली भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलेले गोव्याचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना संघचालक पदावरून हटविण्यात आले आहे. भाजपविरुद्ध राजकीय पयार्याय देण्याच्या त्यांच्या घोषणामुळे केंद्राच्या सूचनेवरून प्रांत कार्यकारणीमार्फत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ मनमोहन वैद्य यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयांना देण्यात येणारे अनुदान  बंद करण्याची मागणी करून मंचातर्फे आंदोलन छेडले होते आणि वेलिंगकर हे मंचाचे समन्वयक होते. भाजपला उघड आव्हान देताना या पक्षाबरोबर गोव्यात सत्तेत सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला 30 सप्टेंबर पर्यंत युती तोडण्याची सूचना मंचाने केली होती.  अन्यथा मंचातर्फे भाजपसह मगोपक्षाविरुद्धही निवडणुकीत उमेदवार करण्याचा इशारा दिला होता. 
या घटने नंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी संघाच्या केंद्रीय नेत्यांकडे वेलिंगकर यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी मनधरणी केली होती.  मंगळवारी महाराष्ट्र प्रांताचे प्रतिनिधी वेलिंगकर यांच्या घरी आले होते. भाभा सुमच्या बँनरखाली आंदोलन करण्यास प्रांताची हरकत नाही, परंतु राजकीय पर्यायाच्या निर्णयावर फेर विचार करावा अशी सूचना वेलिंगकर यांना करण्यात आली, परंतु वेलिंगकर यांनी ती फेटाळली. आपल्या निर्णयामुळे संघाला अडचण होत असेल तर आपलयाला संघचालकपदाच्या जबाबदारीतून मूक्त करण्यात हरकत नाही, परंतु भाभासुम राजकीय पर्यायाच्या निर्णयावर फेरविचार करणार नाही असे त्यांनी प्रांताच्या प्रतिनिधींना सांगितले. 
त्यावर त्यांना संघचालकपदाच्या जबाबदारीतून मूक्त करण्यात आले की नाही हे सांगण्यात आले नव्हते. परंतु नंतर त्यांना ही माहिती देण्यात आली अशी माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा भेटीदरम्यान त्यांना मंचातर्फे काळे झेंडे दाखविण्यात आले होते. परंतु या गोष्टीचा प्रांताच्या प्रतिनिधीच्या बेठकीत उल्लेख झाला नाही. त्यामुळे भाजपाला राजकीय पर्याय  देण्याच्या निर्णयामुळेच त्यांना पदावरून हटविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Goa federator Welingkar deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.