गोवा विधानसभा अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात

By admin | Published: July 23, 2016 07:06 PM2016-07-23T19:06:14+5:302016-07-23T19:06:14+5:30

विधानसभा निवडणुका जवळ येत असताना होत असलेल्या या अधिवेशनात विरोधक आक्रमक होतील हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत

Goa Legislative Assembly commences from Monday | गोवा विधानसभा अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात

गोवा विधानसभा अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात

Next
>ऑनलाइन लोकमत - 
पणजी, दि. 23 -  राज्य विधानसभेच्या अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असताना होत असलेल्या या अधिवेशनात विरोधक आक्रमक होतील हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरही अधिवेशनासाठी सज्ज झाले आहेत.
 
12 ऑगस्टर्पयत म्हणजे पंधरा दिवस कामकाज चालेल. तारांकित व अतारांकित मिळून सुमारे अडीच हजार प्रश्न या पंधरा दिवसांत येणार आहेत. तीन अपक्ष आमदारांनी मिळून आठशेपेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तेरापेक्षा जास्त सरकारी विधेयके अधिवेशनात सादर केली जाणार आहेत. त्यात अनधिकृत घरे कायदेशीर करण्याचे महत्त्वपूर्ण विधेयक सादर होणार असून ते विधेयक मोठय़ा चर्चेचा विषय बनू शकेल. वाहतूक क्षेत्रतील विविध प्रकारचे कर व शुल्क वाढविण्यातील अनेक समस्यांबाबतच्या लक्षवेधी सूचना तसेच खासगी ठराव अधिवेशनात सादर होणार आहेत. अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी मराठीला राजभाषा बनविण्याविषयीचा ठराव विधिमंडळ खात्याकडे सादर केलेला आहे. 
 
विरोधक व सरकार यांच्यातील जुगलबंदी या अधिवेशनात वाढलेली पाहायला मिळेल, असे अनेकांना वाटते; कारण विधानसभा निवडणुका येत्या जानेवारीमध्ये होतील व सोमवारपासून सुरू होणारे अधिवेशन हेच शेवटचे असेल असे विरोधकांकडून मानले जात आहे. प्रादेशिक आराखडा अस्तित्वात नसतानाही गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेले प्रकल्प व त्यासाठी मान्य केलेले भू-रूपांतरण, मांडवीतील कॅसिनो, रेंगाळलेले साधनसुविधा प्रकल्प, निवृत्तीनंतर अधिका:यांना सेवावाढ देण्याचे प्रकार, एलईडी बल्ब वितरणावेळी विरोधी आमदारांना डावलण्याचा झालेला प्रकार, आरोग्य क्षेत्रतील बेपर्वाई, गोमेकॉ इस्पितळातील पाणी समस्या, वाढती गुन्हेगारी, खनिज व्यवसायाबाबतच्या समस्या, अशा अनेक विषयांबाबतचे प्रश्न विरोधकांनी विधिमंडळ खात्यास सादर केलेले आहेत.
 
विधानसभा अधिवेशनास सामोरे जाण्यास सरकार तयारच आहे. मला स्वत:ला त्यासाठी खूप वेगळी तयारी करावी लागली आहे असे मुळीच नाही. मी रोज सकाळपासून रात्री उशिरार्पयत सरकारी कामातच व्यस्त असतो. त्यामुळे अधिवेशन असो किंवा नसो; मला रोजच तयारी करावी लागते. अधिवेशन आहे म्हणून मी आताच चोवीस तास फाइल्स वाचण्यातच गढून गेलो आहे, असे काही नाही. नेहमीप्रमाणो माङो काम सुरू आहे. अधिवेशनासाठी जी काही पूर्वतयारी लागते, ती माङया दैनंदिन कामातून झालेलीच आहे.
- लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री
 

Web Title: Goa Legislative Assembly commences from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.