गोवा - साळावली धरण भरले, जलनक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 06:14 PM2016-07-23T18:14:49+5:302016-07-23T18:15:27+5:30
संपूर्ण दक्षिण गोव्याची तहान भागवणारं साळावली धरण भरले आहे, विहिरीत पाणी कोसळताना दिसणारी जलनक्षी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत
>ऑनलाइन लोकमत -
(छाया : पिनाक कल्लोळी)
मडगाव (गोवा), दि. 23 - संपूर्ण दक्षिण गोव्याची तहान भागवणारं साळावली धरण भरले आहे. संततधार पावसाने ते शनिवारी भरले. धरण भरल्यावर जवळच्याच विहिरीत पाणी कोसळत राहते. त्या विहिरीच्या खालील कालव्याद्वारे हे पाणी पुढे नेले जाते. विहिरीत पाणी कोसळताना जी जलनक्षी दिसते ती पाहणे म्हणजे पर्यटांसाठी पर्वणीच. त्यासाठीच मडगावपासून पूर्वेला सुमारे तीस किलोमीटरवरील हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक लोकांची मोठी गर्दी होते.