शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्वावलंबी बनण्याचे उद्दिष्टय - सत्यनारायण नोवाल

By admin | Published: April 11, 2017 08:16 PM2017-04-11T20:16:52+5:302017-04-11T23:00:52+5:30

देशाला दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने आम्ही स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

The goal of becoming self-reliant in weapon production - Satyanarayan Nawal | शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्वावलंबी बनण्याचे उद्दिष्टय - सत्यनारायण नोवाल

शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्वावलंबी बनण्याचे उद्दिष्टय - सत्यनारायण नोवाल

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 11 - देशाला दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने आम्ही स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्र निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये स्वावलंबी बनण्याचे आमचे उद्दिष्टय आहे असे पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्यनारायण नोवाल यांनी सांगितले. त्यांना बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. डॉक्टर एकनाथ खेडेकर आणि सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते सत्यनारायण नोवाल यांना सन्मानित करण्यात आले. 
 
युपीएएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
हा सोहळा थेट पाहा फेसबुकवर...
facebook.com/lokmat
 
सत्यनारायण नुवाल, चेअरमन, सोलर ग्रुप 
पैसे वाचविण्यासाठी बल्लारपूरच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक रात्री काढणारा तरुण देशातील सर्वात मोठा स्फोटक उत्पादक समूहाचा सर्वेसर्वा बनतो...सत्यनारायण नुवाल यांनी घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. गरिबीतून वर आलेल्या नुवाल यांनी स्वत:च्या कष्टाने सोलर समूहाला आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील प्रस्थापित केले. सुरक्षितता, गुणवत्ता आणि पर्यावरण रक्षण हा सत्यनारायण नुवाल यांचा मूलमंत्र आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे सत्यनारायण नुवाल देशातील अग्रणी उद्योगपतींपैकी एक आहेत. देशात विस्फोटकांचे सर्वाधिक उत्पादन करणा-या कंपनीचे ते मालक आहेत. एक काळ होता, जेव्हा हातावर पोट घेऊन जगणारे सत्यनारायण नुवाल पडेल ते काम करण्यासाठी तयार होते. कधी त्यांनी विहिरी खणण्याचा व्यवसाय केला, तर कधी चक्क वेस्टर्न कोल फिल्ड्स येथे ठेकेदारांसाठी बांधकाम साहित्य वाहून नेण्याचे काम केले. खडतर दिवसांत तर त्यांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेतला, पण जिद्द कधी हारली नाही. स्वप्न मोठे होते अन् यशाचे शिखर त्यांना खुणावत होते. चंद्रपूरमधील एका व्यापाराकडून त्यांनी विस्फोटकांचा परवाना त्यांनी भाडेतत्त्वावर मिळविला व व्यवसायाच्या माध्यमातून रसायन व विस्फोटक व्यवसायाच्या अनुभवाची शिदोरी जमा केली. तो व्यवसाय तर सोडावा लागला. मात्र, काही काळातच देशाचे मध्यस्थान असलेल्या नागपूरपासून त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली. १९८४ मध्ये इंडियन एक्सप्लोझिव्हचे वितरक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९९० पर्यंत त्यांची मेहनत व धडाडी यांच्या बळावर ते विस्फोटकांचे देशातील एक मोठे व्यापारी बनले. खाणउद्योग व पायाभूत सुविधा निर्माण करणा-या प्रकल्पांना औद्योगिक स्फोटकांचा पुरवठा करणारा सोलर समूह देशातील सर्वात मोठा स्फोटक उत्पादक आहे. कंपनीची उलाढाल १५०० कोटींच्या घरात असून, त्यांनी एका वर्षात ३०० कोटींचा नफा मिळवलेला आहे. नुवाल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील व्यापार वाढविला व २० पेक्षा अधिक देशांना त्यांच्या समूहाकडून माल निर्यात करण्यात येतो. इतकेच काय, तर नायजेरिया, झांबिया व तुर्की या देशांत या समूहाने कारखानेदेखील टाकले आहेत. विस्फोटकांची गुणवत्ता सांभाळत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याबाबतदेखील नुवाल नेहमी दक्ष असतात. हा त्यांनी कामाचा मूलमंत्रच बनविला आहे हे विशेष.
 
या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले, अशा महाराष्ट्रीयनांचा सन्मान करण्यासाठी "लोकमत"ने सुरू केलेल्या पुरस्काराची एव्हाना परंपरा झाली आहे. "लोकमत"च्या संपादकीय चमूने केलेले मंथन, जगभरातील कोट्यवधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून विजेत्यांची निवड साकारत आहे. १४ क्षेत्रांमधील प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या मान्यवरांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यात इतरांना प्रेरणादायी ठरेल, अशा कार्याचे बीज पेरणाऱ्यांचाही शोध या निमित्ताने घेतला गेला. समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच विकास आणि समृद्धीच्या वाटचालीत भर टाकलेल्या नानाविध क्षेत्रांमधील प्रतिभेचा आरसा म्हणून युपीएल प्रायोजित "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कारांकडे पाहिले जात आहे.
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली आहे. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग आहे.
 
यंदा मोलाची भर...: आता चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ‘पायाभूत सेवा’, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" यातील एकंदर १३ कॅटेगरींसह "वैद्यकीय" क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४  कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लीक करा
lmoty.lokmat.com
 

Web Title: The goal of becoming self-reliant in weapon production - Satyanarayan Nawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.