ध्येयवेडया डॉक्टराने गाव केले कुपोषणमुक्त

By admin | Published: July 6, 2016 06:02 PM2016-07-06T18:02:08+5:302016-07-06T18:02:08+5:30

एका ध्येयवेड्या डॉक्टराने रामहिंगणी (ता़ मोहोळ) येथील कुपोषित बालकांची मोफत तपासणी व औषधोपचार तर केलेच पण आजही बालकांची मोफत तपासणी करतात ते पुन्हा कुपोषित होऊ

The goal was made by the veteran doctor, malnutrition free | ध्येयवेडया डॉक्टराने गाव केले कुपोषणमुक्त

ध्येयवेडया डॉक्टराने गाव केले कुपोषणमुक्त

Next

महेश कोटीवाले 

सोलापूर, दि. ६ : लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असे आपण मानतो़ पण या फुलांनाही अनेक संकटे येतात़ हसणे, बागडण्याच्या वयात एखादा आजार झाला की साऱ्यांनाच वाईट वाटते़ मात्र असे नुसते वाईट न वाटून घेता एका ध्येयवेड्या डॉक्टराने रामहिंगणी (ता़ मोहोळ) येथील कुपोषित बालकांची मोफत तपासणी व औषधोपचार तर केलेच पण आजही बालकांची मोफत तपासणी करतात ते पुन्हा कुपोषित होऊ नयेत म्हणूऩ डॉ़ प्रदीप पाटकर हे त्या ध्येयवड्या डॉक्टराचे नाव़
रामहिंगणी येथे चार वर्षांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ़ पाटकर हे येथे आले होते़ गावात यायला धड रस्ता नाही, रेल्वेगेटमुळे रुग्ण वेळेत पोहोचत नाहीत़ मिळेल तेव्हाच वाहनाने मोहोळला येतात़ अशा गावी येतानाच त्यांना एक माणुसकीची जाणीव झाली़ या गावासाठी आपण काही तरी करावे, असे ठरवले़

चार वर्षांपूर्वी अंगणवाडीसेविका सुवर्णा पाटील यांनी बालकांची तपासणी याच डॉ़ पाटकर यांच्याकडून केली होती़ यात काही बालके कुपोषित होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात आले़ तेव्हा डॉ़ पाटकर यांनी बालकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला़
मोहोळ येथील त्यांच्या खासगी दवाखान्यात त्यांनी या बालकांची मोफत तपासणी करून शक्य तितकी औषधे मोफत दिली़ इतके करून न थांबता त्या बालकांच्या आईवडिलांचे समुपदेशनही केले़ ० ते ६ वयोगटातील बालकांमध्ये उंचीनुसार व वृद्धीनुसार असे कुपोषणाचे दोन प्रकाऱ रामहिंगणी येथे वृद्धीनुसार या प्रकारात एकूण ७ बालके आढळली़ यात तीन मुले, चार मुलींचा समावेश होता़ त्यामुळे त्यांनी बालकांची योग्य ती काळजी घेऊन औषधोपचार केले़ बालकांवर योग्य औषधोपचार केल्यास सहा महिन्यांत कुपोषित बालके निरोगी होतात़.

एका बालकास खासगी दवाखान्यात औषधोपचार केल्यास १५०० रुपये खर्च येतो, मात्र डॉ़ पाटकर यांनी केवळ मानवतेच्या भूमिकेतून ही मोफत सेवा बजावली आहे़ त्यामुळे आज रामहिंगणी गावात एकही कुपोषित बालक नाही़ यामुळे आरोग्य समृद्ध झाले असले तरी डॉ़ पाटकर यांची नाळ या गावाशी जोडली गेल्याने येथील बालकांच्या आरोग्याविषयी त्यांनी घेतलेला वसा निश्चित वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना एक आदर्शच आहे़
---------------------------------
मातांनी घ्यावी काळजी
उंची व वयाच्या मानाने बालकांचे नसणारे वजन म्हणजे ह्यकुपोषणह्ण ही सोपी व्याख्या़ जीवनसत्त्वाचा अभाव, गॅस्ट्रो, न्युमोनिया यासारख्या आजारांच्या विळख्यात बालके सापडून कुपोषित होतात़ अशावेळी त्यांच्या मातेची भूमिका महत्त्वाची असते़ हल्ली बालकांना योग्य जीवनसत्त्वयुक्त आहाराचा समतोल न साधणे, मातेच्या अंगावरील दुधापेक्षा वरील दूध व बिस्किटांचा अनावश्यक वापर करणे या चुकीच्या गोष्टींमुळे कुपोषणाचा धोका वाढत आहे़ यासाठी मातांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ़ प्रदीप पाटकर यांनी सांगितले़
-------------------
आपण जिथे राहतो, वाढलो त्याच्यापेक्षा अन्य भागात गेल्यानंतर मात्र तेथील परिस्थिती पाहून आपले मन नक्कीच संवेदनशील झाले पाहिजे़ कुपोषित बालके अशा गावात कशी राहतात़, हा प्रश्न अस्वस्थ करणारा होता़ आता मात्र एक समाधान आहे की आपण काही तरी त्यांच्यासाठी करू शकलो़
- डॉ़ प्रदीप पाटकर, मोहोळ
-------------------
रुग्णसेवा हीच ईशसेवा मानून आमच्या छोट्या खेडेगावातील कुपोषित बालकांसाठी डॉक्टरांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहतील़ त्यांचे कार्य पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली़
- सुवर्णा पाटील,
अंगणवाडीसेविका

Web Title: The goal was made by the veteran doctor, malnutrition free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.