गोव्यातील हेराल्ड वृत्तसमूहाचा छापखाना सील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2016 11:24 PM2016-07-14T23:24:55+5:302016-07-14T23:34:49+5:30

गोव्यातील ख्रिस्ती समाजात लोकप्रिय असलेले इंग्रजी दैनिक हेराल्डचा छापखाना पोलिसांनी सील केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या दैनिकाचा उद्याचा (शुक्रवार) अंक प्रकाशित होईल की नाही,

Goa's Herald Newsroom seal print? | गोव्यातील हेराल्ड वृत्तसमूहाचा छापखाना सील?

गोव्यातील हेराल्ड वृत्तसमूहाचा छापखाना सील?

Next

गुन्हा अन्वेषणची कारवाई : जुगारप्रकरणी पणजी, मडगावसह सहा कार्यालयांवर छापे; कसून तपासणी
पणजी : गोव्यातील ख्रिस्ती समाजात लोकप्रिय असलेले इंग्रजी दैनिक हेराल्डचा छापखाना पोलिसांनी सील केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या दैनिकाचा उद्याचा (शुक्रवार) अंक प्रकाशित होईल की नाही, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने हेराल्ड ग्रुपविरुद्ध जुगार चालवित असल्याचा गुन्हा नोंदविला असून या ग्रुपच्या सर्व कार्यालयांवर गुरुवारी छापे टाकण्यात आले. या कार्यालयांची झडती घेतानाच हेराल्डच्या वेर्णा येथील छापखान्यालाही सील ठोकल्याचे वृत्त आहे.
गुन्हा नोंदविल्यावर या वर्तमानपत्रांच्या पणजी, पर्वरी, मडगावसह सहाही कार्यालयांवर तत्काळ छापे टाकले. या छाप्यातून हाऊजी प्रकारच्या जुगाराची तिकिट्स व इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले.
गुरुवारी सायंकाळी अचानक हा छापा टाकल्यामुळे हेराल्डच्या कार्यालयांत एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी पणजीच्या कार्यालयात एका बाजूने झडती चालू ठेवली, तर दुस-या बाजूने कार्यालयात येणा:या व जाणा-या कर्मचा-यांवर र्निबध लादत तपासणी चालू ठेवली. गुन्हा अन्वेषणच्या सर्व ज्येष्ठ पोलीस अधिका-यांच्या उपस्थितीत हा छापा टाकण्यात आला. त्यात निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, दत्तगुरू सावंत, राजेश जॉब व इतर अधिका-यांचा समावेश होता.
अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी हेराल्डविरुद्ध हाऊजी नावाने जुगार चालवित असल्याची तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाकडे केली होती. गोवा दमण दीव जुगारविरोधी कायदा व भारतीय दंड संहिता कलम 120 ब अन्वये हा गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)

यांच्यावर गुन्हे..
- मुख्य संपादक राउल फर्नाडिस
- हेराल्डचे (इंग्रजी) संपादक सुजय गुप्ता
- मार्केटिंग विभागाचे कर्मचारी

बस भरून फौजफाटा
हेराल्डच्या पणजी कार्यालयावर टाकलेला छापा हा अत्यंत नियोजनबद्ध व कडक पोलीस बंदोबस्तात टाकला होता. त्यासाठी बस भरून फौजफाटाही आणला होता. बरेच पोलीस हेराल्ड कार्यालयात होते आणि तितकेच कार्यालयाच्या बाहेर होते, तर उर्वरित बसमध्ये बसून होते.

संगणक जप्त
हेराल्डच्या कार्यालयातील संगणक, काही नोंदवह्या व इतर दस्तावेज पोलिसांनी जप्त केला आहे. त्या शिवाय इतर संशयास्पद वस्तूंचीही झाडाझडती घेण्यात आली.

Web Title: Goa's Herald Newsroom seal print?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.