गोव्याच्या लोकायुक्त पदाला वालीच नाही
By admin | Published: September 23, 2015 01:16 AM2015-09-23T01:16:16+5:302015-09-23T01:16:16+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे एखादे निवृत्त न्यायाधीश किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती यांनी गोव्यात लोकायुक्तपद स्वीकारावे म्हणून राज्य सरकारने प्रयत्न चालविला आहे
सद्गुरू पाटील, पणजी
सर्वोच्च न्यायालयाचे एखादे निवृत्त न्यायाधीश किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती यांनी गोव्यात लोकायुक्तपद स्वीकारावे म्हणून राज्य सरकारने प्रयत्न चालविला आहे; पण आतापर्यंत ज्यांच्याशी सरकारी यंत्रणेने संपर्क साधला, त्यांनी लोकायुक्तपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.
अलीकडेच सरकारने लोकायुक्त पदासाठी पात्र उमेदवाराचा म्हणजेच शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली. काही निवृत्त न्यायाधीशांशी राज्याचे अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही संपर्क साधला. त्यांनाही त्यात यश आले नाही. काही निवृत्त न्यायाधीशांना कोणत्याच वादात पडायचे नसते किंवा अकारण टीकाही ओढवून घ्यायची नसते. त्यामुळे ते लोकायुक्तपद स्वीकारण्यास नकार देतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.