दुष्काळग्रस्तांना भगवानगडची मदत
By admin | Published: September 10, 2015 02:29 AM2015-09-10T02:29:39+5:302015-09-10T02:29:39+5:30
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना
अहमदनगर : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भगवानगड संस्थान सरसावले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या भारजवाडी, बडेवाडी आणि भगवानगड तांडा या तीन गावांतील शेतकरी, मजुरांना पाणी, अन्नधान्य आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्धार गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी केला आहे.
बडेवाडी, भारजवाडी आणि भगवानगड तांडा या तिन्ही गावांत प्रत्येकी १५०० ते १७०० लोकसंख्या आहे. या तिन्ही गावांतील रहिवासी हे ऊसतोड मजूर आहेत. गावात पाण्यासाठी कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने डोंगर-दऱ्यात जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागते. गावात कधीतरी पाण्याचा टँकर येतो. त्यामुळे पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होतात. ऊसतोडीसाठी ७५ टक्के ग्रामस्थ बाहेरगावी असते. परिणामी जनगणना करताना गावाची लोकसंख्या २५ टक्केच नोंदली गेली आहे. या आकडेवारीच्या आधारेच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. टँकरद्वारे मिळणारे पाणी अपुरे असते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकं ती करावी लागते.
या गावात शेतकरी, मजुरांच्या कुटुंबीयांना पाणी, अन्नधान्य पुरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या शिक्षणाचा खर्चही केला जाणार
आहे, अशी ही गावे दत्तक घेण्यामागील भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)