भिवंडीची दगडी शाळा बनली गोदाम

By Admin | Published: March 11, 2015 02:11 AM2015-03-11T02:11:10+5:302015-03-11T02:11:10+5:30

भिवंडीत स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झाल्यानंतर लोकवर्गणीतून बांधलेल्या १२० वर्षांपूर्वीच्या दगडी शाळेतील कार्यालय महापालिकेच्या

Goddess became a storied school of Bhiwandi | भिवंडीची दगडी शाळा बनली गोदाम

भिवंडीची दगडी शाळा बनली गोदाम

googlenewsNext

भिवंडी : भिवंडीत स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झाल्यानंतर लोकवर्गणीतून बांधलेल्या १२० वर्षांपूर्वीच्या दगडी शाळेतील कार्यालय महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात हलवावे आणि या ऐतिहासिक शाळेत पुन्हा वर्ग सुरू करण्यात यावेत, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे. याच इमारतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौथीपर्यंत शिकल्याचे भिवंडीकर सांगतात़
महापालिकेच्या काही बांधकाम अधिकाऱ्यांनी मनपाच्या जुन्या ऐतिहासिक दगडी भिंतीच्या या शाळेची योग्यवेळी दुरूस्ती न करता जाणीवपूर्वक नवीन इमारत बांधण्याचे षडयंत्र रचले आहे. या शाळेमागे इमारतीत शिक्षण मंडळाचे कार्यालय होते. ती मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी तेथील वर्ग दुसऱ्या इमारतीत हलवून त्या ठिकाणी नव्याने शिक्षण मंडळाचे कार्यालय सुरू केले. नवीन इमारत बांधल्यानंतरही हे कार्यालय तिथे हलविण्यात आले नाही. शिक्षण मंडळाच्या सभापती व उपसभापतींची कार्यालये महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळाचे कार्यालयदेखील तेथे सुरू करणे अपेक्षीत आहे.
सध्या तळमजल्यावर केवळ शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी व इतर स्टाफ बसतो. पहिल्या मजल्यावरील वर्गांना गोदाम बनवले आहे. शाळेतील वर्ग इतरत्र हलवल्याने पटसंख्यादेखील कमी झाली आहे. शिक्षण मंडळाने पहिल्या मजल्यावरील बंद वर्गांत तुटलेली बाके, पुस्तके आदि सामान ठेवून इमारतीचा गैरवापर केला आहे. येथील कार्यालय बंद करून दगडी शाळेत पुन्हा वर्ग सुरू करावेत, अशी मागणी माजी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. (प्रतिनीधी)

Web Title: Goddess became a storied school of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.