पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन

By Admin | Published: September 25, 2015 05:27 PM2015-09-25T17:27:12+5:302015-09-25T17:56:25+5:30

अपुरा पाऊस आणि पाणी टंचाईची दखल घेत पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.

Goddess Ganpati of Pune's fifth highest honor | पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २५ - अपुरा पाऊस आणि पाणी टंचाईची दखल घेत पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे हौदात विसर्जन करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. कसबा गणपती, गुरुजी तालीम गणपती यांच्यापाठोपाठ अन्य तीन मंडळांनी हा कौतुकास्पद आहे.
 
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने पुण्यातही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून गणेश विसर्जनासाठी मुळा - मुठा नदीत खडवासला प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी गणेशभक्तांकडून केली जात होती. मात्र पाणी टंचाई असताना गणेश विसर्जनासाठी धरणातील पाणी सोडण्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. गुरुवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खडकवासलातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता पुण्यातील मानाच्या गणपतींनी हौदात विसर्जन करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. महापालिकेने शहरात विविध ठिकाणी विसर्जनासाठी १०० हौद तयार केले आहेत. 

 

Web Title: Goddess Ganpati of Pune's fifth highest honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.