भक्तियात्रेची अवीट वारी!
By admin | Published: July 8, 2014 12:27 AM2014-07-08T00:27:23+5:302014-07-08T00:27:23+5:30
पंढरीचा विठूराया युगे अठ्ठावीस विटेवरी उभा आहे, भक्तांच्या प्रतीक्षेत. त्याच विठूरायाच्या भेटीसाठी दरवर्षी वारकरी संप्रदाय वारी करीत आहे.
कणकवली : महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांच्या सत्यप्रती सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी येथील बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीच्यावतीने महाविद्यालयानजिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या कार्यालयाचा शुभारंभ कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक रूपेश नार्वेकर, कन्हैय्या पारकर, सुमेधा अंधारी, गौतम खुडकर, माधुरी गायकवाड, सुविधा साटम, प्रसाद अंधारी, परेश बागवे, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांबरोबरच शासकीय दाखले मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे. कणकवली महाविद्यालयाजवळच हे कार्यालय सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी तसेच पालकांनाही ते सोयीचे ठरणार असून नागरिकांमधून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)