गोदाकाठ शून्यावर, दवबिंदू गोठले; नाशिक जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 05:15 AM2019-02-10T05:15:58+5:302019-02-10T05:20:01+5:30

नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते. ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दवबिंदू गोठले होते. मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे.

Goddess Zune, Dwabindu frozen; The possibility of hailstorm in Nashik district | गोदाकाठ शून्यावर, दवबिंदू गोठले; नाशिक जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता

गोदाकाठ शून्यावर, दवबिंदू गोठले; नाशिक जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता

googlenewsNext

मुंबई : नाशिक जिल्ह्यात गोदाकाठचे तापमान शनिवारी पहाटे शून्य अंश सेल्सिअस झाले होते. ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दवबिंदू गोठले होते. मुंबईचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. चालू हंगामातील हे सर्वाधिक कमी किमान तापमान आहे.
दिवसासह रात्री वाहणारे थंड वारे कमाल आणि किमान तापमान घसरण्यास कारणीभूत आहेत. रविवारी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात शीतलहर येईल. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सांगलीत ७२ वर्षांचा विक्रम मोडला
सांगली जिल्ह्यात १५ फेब्रुवारी १९७२ मध्ये ८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीला ८.४ अंश सेल्सिअस इतक्या कमी विक्रमी तापमानाची नोंद झाली.

विदर्भात लाट
१० फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
१० फेब्रुवारी : विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात
थंडीची लाट
११ फेब्रुवारी : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा
१२ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा अंदाज
१३ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल.
१२ फेब्रुवारी : उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होईल

Web Title: Goddess Zune, Dwabindu frozen; The possibility of hailstorm in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.