'हॉलमार्किंगच्या त्रुटींविरुद्ध कोर्टात जाणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 03:39 AM2020-02-23T03:39:10+5:302020-02-23T03:39:28+5:30

फत्तेचंद रांका यांची माहिती

'Going to court against Hallmarking errors' | 'हॉलमार्किंगच्या त्रुटींविरुद्ध कोर्टात जाणार'

'हॉलमार्किंगच्या त्रुटींविरुद्ध कोर्टात जाणार'

Next

कोल्हापूर : सोन्याची शुद्धता तपासणीचा हॉलमार्किंग कायदा हवाच; पण कायद्यातील काही जाचक त्रुटी व्यापाऱ्यांना नाहक अडचणीच्या आहेत. त्या दूर करण्यासाठी ‘बंद’सारखी आंदोलने नव्हेत; तर कायदेशीर मार्गाने लढाई लढणार आहोत. त्यासाठी १५ दिवसांत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. फत्तेचंद रांका यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाच्या वतीने ‘हॉलमार्किंग कायदे’ या विषयावर शनिवारी सराफ व सुवर्णकारांचा मेळावा झाला. अ‍ॅड. रांका म्हणाले, केंद्र सरकारने जानेवारी २०२१ पासून हॉलमार्किंग कायदा सक्तीचा केलेला आहे. तो जनतेच्या फायद्याचा आहे. सराफ, सुवर्णकारांचा या कायद्याला विरोध नाही; पण कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध आहे. सध्या महाराष्टÑात २३, २४ कॅरेटचे उच्च प्रतीचे सोन्याचे दागिने विकले जात असताना येथे बंदीचे कारण नाही; पण उत्तर प्रदेशात कमी कॅरेटचे दागिने विकले जातात, तेथे बंदी योग्य आहे.

सोन्याचे नमुने घेताना त्याच्या शुद्धतेबाबत हॉलमार्क सेंटर तपासणी करणार; मग नंतर त्या शुद्धतेत फरक पडल्यास जबाबदार हॉलमार्क सेंटरवर कारवाई हवी, असे सांगून रांका म्हणाले, व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर हॉलमार्किंग सेंटरला शुल्क द्यावे लागते. मग उद्या हॉलमार्कमध्ये फरक पडला तर व्यापाºयाचा परवाना रद्द करणे, पाचपट दंड करणे, आदी जाचक अटी आहेत. त्याविरुद्ध हायकोर्टात जाणार आहोत.

Web Title: 'Going to court against Hallmarking errors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.