अविश्वासाविरोधात न्यायालयात जाणार
By admin | Published: August 6, 2014 02:08 AM2014-08-06T02:08:12+5:302014-08-06T02:08:12+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या फेरलेखापरीक्षण अहवालात विद्यमान संचालकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
Next
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या फेरलेखापरीक्षण अहवालात विद्यमान संचालकांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेत हा अहवाल मांडला गेला तर आपले पितळ उघडे पडेल, या भीतीपोटी सर्व संचालकांनी माङया विरोधात षड्यंत्र रचून बेकायदेशीररित्या माङयावर अविश्वास ठराव मंजूर केला आहे. मात्र, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसून, या ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महामंडळाचे उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर यांच्या विरोधात
विनयभंगाची तक्रार दाखल केलेल्या सभासदांना पाठीशी घातल्याच्या कारणावरून सोमवारी कार्यकारिणीच्या बैठकीत संचालकांनी कोंडके यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले. या पाश्र्वभूमीवर कोंडके यांनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, माजी अध्यक्ष प्रसाद सुव्रे यांच्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहारांवर व लेखापरीक्षणावर सभासदांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी पुनर्लेखापरीक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार केलेल्या या फेरलेखापरीक्षणात संचालकांनी दारूचे लायसन्स, वैयक्तिक कार्यक्रम, सत्कार सोहळे अशासाठी महामंडळाचा पैसा वापरल्याचा
ठपका ठेवण्यात आला आहे.
सर्वसाधारण सभेत हा अहवाल मी सभासदांसमोर मांडणार होतो, म्हणून माझी अध्यक्षपदाची
मुदत संपायला केवळ 2क् दिवस
बाकी असताना माङयाविरोधात अविश्वास ठराव करण्यात आला. (प्रतिनिधी)
याबाबत मी काहीच बोलू शकत नाही..
विनयभंगाच्या तक्रारीबद्दल विचारले असता कोंडके म्हणाले, ही घटना घडली त्यावेळी मी उपस्थित नव्हतो, त्यामुळे हे योग्य की अयोग्य यावर मी बोलू शकत नाही. म्हणूनच निवृत्त न्यायाधिशाच्या एकसदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी करावी, असा माझा आग्रह होता. मात्र तो हाणून पाडला गेला.