गोकुळ दूध महागले, लिटरला ५३ रुपये अंमलबजावणी १ जुलैपासून
By Admin | Published: June 24, 2016 09:28 PM2016-06-24T21:28:59+5:302016-06-24T21:28:59+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने(गोकुळ) दूधाच्या विक्री दरात म्हैस व गाय दूधासाठी लिटरला दोन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 24 - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने(गोकुळ) दूधाच्या विक्री दरात म्हैस व गाय दूधासाठी लिटरला दोन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे. दूधाच्या खरेदी दरात लिटरला म्हैस दूधासाठी १ रुपये ७० पैसे व गायीसाठी १ रुपये ३० पैसे वाढ करण्याचा निर्णय संघाने दोनच दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळे विक्री दरातही वाढ होणार हे गृहितच होते. परंतू त्यातही संघाने सरसकट गाय व म्हैस दूधासाठी दोन रुपये वाढ केली. नव्या दरानुसार मुंबईत आता म्हैस दूधासाठी लिटरला ५३ रुपये तर गाय दूधासाठी ४१ रुपये मोजावे लागणार आहेत.