भेसळ रोखण्यासाठी 'गोकुळ' दूध संघाचा अनोखा उपाय; ग्राहकांनी कसं ओळखावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:06 PM2021-11-16T16:06:35+5:302021-11-16T16:06:46+5:30

आता गोकुळचं दूध ग्राहकांपर्यंत अधिक सुरक्षितपणे पोहोचणार, 'गोकुळ'चं दूध आतापर्यंत पॉलिपिक पिशवीतून वितरित होत असे. ही पिशवी तीन लेअर्स किंवा पडदे असलेली होती.

Gokul's unique experiment to prevent adulteration of milk; How to identify customers? | भेसळ रोखण्यासाठी 'गोकुळ' दूध संघाचा अनोखा उपाय; ग्राहकांनी कसं ओळखावं?

भेसळ रोखण्यासाठी 'गोकुळ' दूध संघाचा अनोखा उपाय; ग्राहकांनी कसं ओळखावं?

googlenewsNext

मुंबई - दुधामध्ये होणारी भेसळ रोखून ग्राहकांपर्यंत उत्तम दर्जाचं आणि शुद्ध दूध पोहोचवण्यासाठी सहकार क्षेत्रातील अग्रणी ब्रँड असलेल्या गोकुळ दूध संघाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता 'गोकुळ'चं दूध अधिक सुरक्षित पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे दुधात भेसळ करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर ते पॅकिंगवरून ग्राहकांना सहज लक्षात येईल. विशेष म्हणजे ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी 'गोकुळ'ने केलेल्या या प्रयत्नांचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही.

दूध उत्पादक आणि वितरक संघांमध्ये 'गोकुळ'ची वेगळी ओळख आहे. १९८८ पासून मुंबईत 'गोकुळ'ने आपल्या शुद्ध, सकस आणि भेसळमुक्त दुधाने एक विश्वासार्हता कमावली आहे. दर दिवशी 'गोकुळ' दूध उत्पादक संघ जवळपास १३ लाख लीटर दुधाचं वितरण करतो. यात गायीच्या दुधात मात्र गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांपर्यंत दूध पोहोचताना त्यात भेसळ होत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. 'गोकुळ' दूध उत्पादक संघाने या घटनांची गांभीर्याने नोंद घेत त्यावर त्वरित उपाययोजना करायचं ठरवलं.

'गोकुळ'चं दूध आतापर्यंत पॉलिपिक पिशवीतून वितरित होत असे. ही पिशवी तीन लेअर्स किंवा पडदे असलेली होती. त्यामुळे त्यात भेसळ करणं शक्य होतं. पण आता 'गोकुळ'ने महत्त्वाचा निर्णय घेत हे पॅकिंग बदलायचं ठरवलं. आता 'गोकुळ'चं दूध ग्राहकांपर्यंत नव्या पॅकिंगमध्ये पोहोचणार आहे. या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे यात पाच लेअर्स असतील. त्यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. तरीही कोणी तसा प्रयत्न केला, तरी वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंगमुळे ग्राहकांनाच ते सहज लक्षात येईल.

याबाबत बोलताना 'गोकुळ' दूध उत्पादक संघाचे संचालक विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ या नावाची विश्वासार्हता खूप मोठी आहे. आम्ही मुंबईत दूध वितरण सुरू केलं, तेव्हापासून आतापर्यंत ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादन देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतून आम्ही ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी 'गोकुळ'चं पॅकिंग अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच यासाठी ग्राहकांकडून एकही जादा पैसा आकारला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही 'गोकुळ'च्या या निर्णयाचं कौतुक केलं. शेतकऱ्यांना सर्वात जास्त दूध खरेदी दर देणारा 'गोकुळ' हा महाराष्ट्रातील एकमेव दूध उत्पादक संघ आहे. शेतकऱ्यांच्या हितासोबत ग्राहकांचं हित जपण्याला 'गोकुळ'ने नेहमीच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे तीनऐवजी पाच लेअर्सचं पॅकिंग करत 'गोकुळ'ने भेसळ रोखण्यासाठी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असं ते म्हणाले. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील 'गोकुळ'करीत असलेल्या नव्या बदलाचे कौतुक करत ग्राहकांना भेसळमुक्त दूध विश्वासाने मिळायला हवे आणि ते केवळ गोकुळच पुरवू शकते असे विशद करून गोकुळने संपादन केलेला विश्वास अखंडित टिकवून ठेवण्याची जबाबदारी संचालकांची असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

गोकुळकडून डॉ. कुरियन यांना मानवंदना

दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उप्तादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात धवलक्रांतीचे पितामह डॉ. वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  डॉ.कुरियन यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त गोकुळच्या वतीने गायीचे दूध नवीन सिक्युरिटी पॉलीफिल्ममधून वितरीत करण्याचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि अभिनेत्री माधवी निमकर देखील उपस्थित होते.  

ग्राहकांनी भेसळ कशी ओळखावी?

गोकुळ व्यवस्थापनाकडून फुलक्रिम दुधासाठी सी.आय छपाई तंत्रज्ञानाची पाच लेअरची सिक्युरीटी फिल्म वापरली जात आहे. अधिक सुरक्षितता म्हणून या फिल्मवर बारीक अक्षरात छपाई करून आतील भाग हा निळ्या रंगाच्या फिल्मचा थर दिलेला आहे. त्यामुळे जर कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास सिल केलेल्या जागी काळसर ठिपका दिसतो. त्यामुळे ग्राहकांना भेसळ ओळखता येईल.  

गोकुळचे वैशिष्टं

सध्या दररोज एकूण सरासरी १३ लाख लीटर दुधाची विक्री केली जात आहे. यात मुंबई शहरात एकूण सरासरी ९ लाख लीटर दुधाची विक्री केली जाते.

Web Title: Gokul's unique experiment to prevent adulteration of milk; How to identify customers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Gokul Milkगोकुळ