सोन्या-चांदीची भांडी, गेली कुठे सारी?
By Admin | Published: January 19, 2016 08:42 PM2016-01-19T20:42:50+5:302016-01-19T20:42:50+5:30
जे निसर्गदत्त आहे, सभोवताली सहजासहजी उपलब्ध आहे, त्यावर प्रयोग क रू न त्यातून नवं काही तरी निर्माण क रणं, ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे.
२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.
टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत २४ जुलै २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.
सोन्या-चांदीची भांडी, गेली कुठे सारी?
जे निसर्गदत्त आहे, सभोवताली सहजासहजी
उपलब्ध आहे, त्यावर प्रयोग क रू न त्यातून नवं काही
तरी निर्माण क रणं, ही मानवाची मूळ प्रवृत्ती आहे.
जमिनीतून मिळणारे धातू मग तो सोनं-चांदी असो वा
लोखंडादि असो- घेऊ न त्यांच्या वस्तू तयार क रणं
आणि त्या उपयोगात आणणं यावर, तो थोडंच
समाधान मानणार? दोन धातूंचा संयोग घडवून
आणला तर? तीन धातूंना एक त्र आणलं तर?
कोणत्या वेगळ्या गुणधर्माची वस्तू निर्माण होते, असे
प्रयोग तो सतत क रत आला आहे. कोणा मिश्र धातूचा
लवचिक पणा वाढतो, कु णाचा क णखरपणा वाढतो,
कु णाला धार लवक र चढते, कु णाचा रंग बदलून तो
अधिक आक र्षक बनतो.. अशी गुणवृद्धी झालेली
ध्यानात यायला लागल्यानंतर तर प्रयोगांना सुमारच
राहिला नाही. अधिकाधिक उपयोगात आलेल्या
धातूला त्या युगाचंच नाव मिळालं. जसं ब्रॉन्झ
(कांस्य) युग, आयर्न (लोह) युग वगैरे. खरं म्हणायचं
तर मिश्र-धातूची व्याख्याच श्रेष्ठ व शुद्ध धातूत
हिणक स धातू मिसळवून तयार के लेला नवा धातू,
अशी होईल.
ब्रॉन्झचं उदाहरण घेऊ . ब्रॉन्झ ऊ र्फ कांस्य हा
मानवानं तयार के लेला पहिला मिश्र धातू. सुमेरिअन
लोकांनी तो इ. स. पूर्व तीन हजार वर्षापूर्वी के ला. 90
टक्के तांब्यात दहा टक्के जस्त मिसळवून तयार
के लेलं ब्रॉन्झ वेगवेगळ्या उपयोगात आणता येतं.
काही प्रकारच्या ब्रॉन्झपासून आरसे चांगले झाले, तर
काहींपासून वाद्यं चांगली बनवता आली, तर
काहींपासून शस्त्र, आयुधं आणि काहींपासून हत्यारं,
साधनं. पर्शियन लोकांनी इ. स. पूर्व 16व्या शतकात
लोखंडात कार्बन वगैरेंचं मिश्रण क रू न स्टील
(पोलाद) निर्माण के लं. पोलादानं आपल्या जीवनात
क्र ांतीसदृश सुधारणा घडवून आणल्या. इतक्या
सुधारणा की ख:या अर्थानं उद्योग-पर्व सुरू झालं,
असंच म्हणावं लागेल. रॉट आयर्न (शुद्ध लोखंड),
कास्ट आयर्न (बीड), स्टील (पोलाद) आदिंनी
आपल्या जीवनात कि ती बदल घडवून आणले, याची
यादी क रू गेल्यास त्यावरच एखादा ग्रंथराज तयार
होईल. जितके प्रकार, तितके उपयोग. किं बहुना
असंही म्हणता येईल की, जितक्या गरजा, तितके
प्रकार झाले पोलादाचे. अगदी स्वयंपाक घरातील
भांडय़ांपासून अवजड यंत्रंर्पयत पोलादाचे प्रकार
उपयोगात आले. कुं भारानं के लेली भांडी, मडकी
वापरणारा मानव एके क पायरी ओलांडत स्टेनलेस
(डागरहित/गंजरहित) स्टीलच्या भांडय़ार्पयत येऊ न
पोहोचला. आता तर त्याही पुढची मजल गाठण्याच्या
प्रयत्नात तो आहे. पण मिश्र-धातू (अलॉय)मुळे
झालेले दैनंदिन जीवनात आणि राहणीमानात झालेले
बदल नाकारता येत नाहीत, हेच खरं. मूळ धातूत
मिसळवलेले अन्य हिणक स धातू, त्यांचे नवे गुणधर्म,
त्यांचे प्रकार यांचं नवं विज्ञानच तयार झालं.
दुर्मिळ म्हणून महाग धातूंचा विशेष उपयोग के ला
जाणं, हे ओघानंच आलं. पुराण काळापासून सोनं
आण रु पं (म्हणजे चांदी) यांचा अर्थव्यवहारात चलन
म्हणून उपयोग होत राहिला. प्रगत समाजात
चलनासाठी नाणी ‘पाडण्यात’ आली. त्या नाण्यावर
त्या प्रगत समाजात शिरोधार्य मानल्या जाणा:या
आदराचं स्थान असलेल्या प्रतिमांचे ‘छापे’ उमटवले
गेले. अगदी 2क्क्क् वर्षापासून अनेक संस्कृ तीतील
अस्तित्वात असलेली चलनाची नाणी ब्रॉन्झ, सोनं
किं वा चांदी यांची होती, हे नाणी संग्राहकांनी के लेल्या
संग्रहातून समजतं. शिवशाहीतील ‘होन’ हे सुवर्ण-
नाणं आज अत्यंत दुर्मिळ आहे. पण छत्रपती
शिवरायांनीही सुवर्ण नाणं प्रचलित के लं होतं, हे
महत्त्वाचं. 50 टक्के सोनं आणि 50 टक्के चांदी हे
सूत्र प्रथम इजिप्शियनांनी क लात्मक वस्तू बनवताना
वापरलं आणि आजर्पयत ते वापरलं जातं.
सोन्याऐवजी तांबं वापरण्यात येतं एवढंच. म्हणजे 5क्
टक्के चांदी आणि 5क् टक्के तांबं. रोमन लोकांनी या
टक्के वारीवर प्रयोग के ले. 75 टक्के तांबं आणि 25
टक्के जस्त सीझर ऑगस्टसच्या काळात (इ. स. पूर्व
200) ‘ब्रास’ तयार के लं गेलं. ‘ब्रास’ला गरिबांचं सोनं
म्हणायला हरक त नव्हती. ते दिसतंही सोन्यासारखं;
पण असतं मात्र स्वस्त. या ‘गोल्डन क ॉपर’ला म्हणजे
‘सोनेरी पितळा’ला ‘ऑरिक ल्क म्’ म्हटलं गेलं. शुद्ध
सोनं हे फ ार लवचिक असतं, त्याचे दागिने सहजी
आकार बदलतात, म्हणून दागिने क रताना त्या शुद्ध
सोन्यात हिणक स धातू मिसळून दागिने क ठीण के ले
जातात. शुद्ध सोनं ‘24 कॅ रेट’ म्हणून ओळखलं
जातं, त्यात हिणक स मिसळून ते ‘22 कॅ रेट’ वगैरे
के लं जातं. काही वेळा ते ‘14 कॅ रेट’, ‘18 कॅ रेट’
क रण्यात येतं. ‘व्हाईट गोल्ड’ नावाचाही एक मिश्र
धातू प्रचारात आहे. अगदी अलीक डे म्हणजे 100 ते
125 वर्षापूर्वी विक सित झालेला. त्याला ‘जर्मन
सिल्व्हर’ असंही म्हणतात.
धातूंच्या मिश्रणाची टक्के वारी बदलली की
गुणधर्म बदलतात. हवा तो आणि हवा तसा गुणधर्म
आणण्यासाठी त्या मिश्रणावर प्रयोग होत असतात.
आजमितीस धातू आणि मिश्रधातू यांची यादी 86
र्पयत पोहोचली आहे. एकोणिसाव्या शतकार्पयत फ क्त
24 धातू / मिश्रधातू ज्ञात होते. त्यापैकी निम्मे म्हणजे
12 अठराव्या शतकार्पयत शोधले गेले होते. याचा
अर्थ असा की, सोनं आणि तांबं या दोन धातूंच्या
आद्यशोधापासून अठराव्या शतकाच्या सुरु वातीर्पयत
फ क्त 12 धातूच आपल्या पूर्वजांना माहीत होते.
रावसाहेब बाळकृ ष्ण आत्माराम गुप्ते यांच्या ‘देशी
हुन्नर’ या ग्रंथात (1889) म्हटलं आहे, ‘‘ऋ ग्वेदात
सोन्याच्या भांडय़ांविषयी दिग्दर्शन के ले आहे. त्वष्ट्रा
नावाचा (दैविक शिल्पकार) मनुष्य धातूंची भांडी फ ार
उत्तम त:हेची क रीत होता; परंतु रिभू नावाचे लोक
देवपूजेची भांडी त्याच्याही पेक्षा सुरेख क रीत, त्यामुळे
त्यास आपले प्रतिस्पर्धी मानून त्यास मारण्याचा
प्रयत्न तो क रीत होता व वेदातच एक ठिकाणी असे
लिहिले आहे की, त्वष्ट्रा त्यांच्या क ौशल्याची आपण
होऊ न तारीफ के ली आहे. पुराणात तर
सोन्यारु प्याच्या व इतर धातूंच्या भांडय़ांविषयी पुष्क ळ
ठिकाणी उल्लेख आहे.
रावसाहेब गुप्ते यांनी ‘‘सोने, रु पे, तांबे, पितळ
इत्यादि धातूंचे जितके सामान हिंदुस्थानात होते,
तितके इतर कोणत्याही जिनसाचे होत नसेल,’’ असं
स्पष्ट विधान के लं आहे. 1889 मध्ये ही परिस्थिती
होती - गुप्ते यांनी कोठे काय होते याची यादीच दिली
आहे - हे गृहित धरले, तरी आता तशी परिस्थिती
नसावी. धातूंच्या भांडय़ांची जागा आता प्लॅस्टिक च्या
सामानाने घेतली असल्याची शक्यता आहे. तरी
आपल्या देशात सोनं प्रचंड प्रमाणावर आहे, यात शंका
नाही. गुप्त्यांनी दिलेली माहिती आणि के लेलं भाष्य
पटणारंच आहे. ते म्हणतात ‘‘ऋ ग्वेदात सोन्याच्या
भांडय़ांन्वे वर्णन आहे.. प्राचीन ग्रंथातूनसुद्धा याविषयी
उल्लेख आहेतच. आनंद प्रदर्शित क रण्याक रिता
एक मेकास नजराणा द्यावयाचा तो सोन्याच्या तबकात
घालून पाठवीत असत, असे सर एडविन अरनॉल
याने क पिलवस्तू या गावी सिद्धारथ (सिद्धार्थ)
राजपुत्रच्या जन्माचे वर्णन क रिताना लिहिले आहे.
अशा सोन्याच्या भांडय़ांचे पुढं काय झालं, यावर भाष्य
क रताना गुप्ते लिहितात-‘‘फ ार प्राचीनकाळची
सोन्याची भांडी आपल्या देशात हल्ली कोठे शिल्लक
असतील की काय ते क ळत नाही. असल्या मौल्यवान
जिनसा मोठमोठय़ा राजवाडय़ांत किं वा जुनाट
देवस्थानात असावयाच्या; परंतु राज्यक्र ांतीमुळे या
दोन्हीही ठिकाणी इतकी उलथापालथ झाली आहे की,
तिच्यामुळे बहुतेक सर्व मौल्यवान धातू सोनाराच्या
मुशीत ओतल्या जाऊ न त्याचे पुन:पुन्हा रू पांतर झाले
असावे, अशी आमची समजूत आहे. तशातून एखादा
जिन्नस चुकू न कोठे राहिला असला, तर तो कि ती
वर्षाचा जुना आहे, हे क ळण्याची पंचाईत पडते, कारण
आमचे इतिहाससुद्धा क विराजाच्या हातात सापडून
रू पांतर पावले आहेत. गुप्त्यांच्या विधानावर
मल्लिनाथीची अधिक गरज आहे काय?
सर जॉर्ज बर्डवूड या प्राच्यविद्याप्रेमी विद्वानानं
जलालाबाद गावच्या एका बौद्ध इमारतीत
सापडलेल्या एका पंचपात्रीपेक्षा अधिक जुनं सोन्याचं
भांडं आढळत नाही, असा निर्वाळा दिला आहे. या
पंचपात्रीत म्हणो काही नाणी होती, त्यावरू न ती येशू
ािस्ताच्या पूर्वी 5क् वर्षे राज्य क रत असलेल्या एका
राजाच्या वेळची असल्याचं अनुमान काढता येतं.
सर जॉर्ज यांनी त्यांच्या पुस्तकात (इंडस्ट्रियल
आर्ट्स ऑफ इंडिया) या सुवर्णपात्रविषयी अधिक ची
माहिती पुरवली आहे.’’ या पंचपात्रीचा वरचा व
खालचा गलथा या दोन्हीस माणके जोडली आहेत व
त्यांच्या मधून-मधून श्रीवत्स काढले आहे. तिच्या
चौफे र आठ कोनाडे आहेत, त्यांत चार चित्रे आहेत
म्हणजे एके क चित्र दोनदा दिलेले आहे. कोनाडय़ाच्या
बाजूला चौकोनी खांब काढून त्यांजवर क मानी
काढिल्या आहेत. या क मानीची आतली बाजू
अर्धगोलाकृ ती आहे व बाहेरू न मधोमध टोंक आहे.
दोन क मानीच्या मध्ये राहिलेल्या त्रिकोणाकृ ती जागेत
पंख पसरलेले बगळे आहेत..’’
या पंचपात्रीवर आता इंडिया सरकारची (राणी
सरकारची) मालकी आहे आणि ती लंडन शहरातील
के नसिंग्टन म्युङिायममध्ये ठेवली आहे, हे सांगायला
गुप्ते विसरले नाहीत. असो. अशा कि तीतरी मौलिक
सुवर्णपात्रंची तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या
अन्य धातूंच्या पात्रंची विल्हेवाट आपण
इतिहासाभिमानी असल्यामुळे लावली आहे. एके काळी
आपल्या असलेल्या वस्तू अन्य राष्ट्रांच्या
वस्तुसंग्रहालयात महत्त्वाचे कोपरे-कोनाडे भूषवित
आहेत. त्या तेथे सुरक्षित आहेत, एवढय़ावरच आपण
समाधान मानावयाचं.