विमानतळावर सोन्याचे दागिने जप्त
By admin | Published: November 4, 2015 02:25 AM2015-11-04T02:25:23+5:302015-11-04T02:25:23+5:30
मंगळवारी पहाटे दोहा येथून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या कतार एअरवेजच्या विमानातून सुमारे २़५० कोटी रुपयांचे सोनेमिश्रित अलंकार जप्त करण्यात आले़
वास्को : मंगळवारी पहाटे दोहा येथून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या कतार एअरवेजच्या विमानातून सुमारे २़५० कोटी रुपयांचे सोनेमिश्रित अलंकार जप्त करण्यात आले़
विमानातून सर्व प्रवासी उतरल्यावर नेहमीप्रमाणे हवाई
गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी
या विमानाची तपासणी केली
असता, त्यांना सी-३३ या आसनाखाली प्लास्टिकच्या तीन पिशव्या सापडल्या़
त्या पिशव्यांची जबाबदारी कोणीही न स्वीकारल्याने अधिकाऱ्यांनी त्या जप्त करून हवाई सुरक्षा विभागाकडे नेल्या़ हवाई सुरक्षा अधिकारी तसेच कतार एअरवेजच्या निरीक्षक अधिकाऱ्याच्या समक्ष त्या पिशव्या उघडण्यात आल्या़ त्यात सुमारे १० किलो वजनाचे अलंकार सापडले़
सोन्याने मढविलेले किमती खडे असल्याने त्याची नेमकी किंमत समजली नसली, तरीही कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांची किंमत सुमारे २़५० कोटी रुपये असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)