महाराष्ट्रात सोन्याचे कण

By Admin | Published: March 12, 2015 01:41 AM2015-03-12T01:41:59+5:302015-03-12T01:41:59+5:30

महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनीमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने

Gold particles in Maharashtra | महाराष्ट्रात सोन्याचे कण

महाराष्ट्रात सोन्याचे कण

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रात नंदुरबार येथील प्रसिद्ध शनीमंदिराजवळ सोन्याचे कण आणि प्लॅटिनम असल्याचे संकेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात संशोधन केले जात आहे, असे जीएसआय मध्य विभागाचे प्रमुख असीम कुमार साहा यांनी नुकतेच सांगितले.
जीएसआयच्या १६५व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील जीएसआयच्या कार्यालयात रॉक गार्डन संग्रहालयाचे उद्घाटन साहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे प्रमुख एम. एम. पवार उपस्थित होते.
नागपूरपासून ७० किमी अंतरावर असलेल्या परसोडी येथे सोने, तांबे आणि प्लॅटिनमचे कण असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, अद्याप येथे कामास सुरूवात झालेली नाही, असे स्पष्ट करून साहा म्हणाले, नंदूरबार परिसरात सुद्धा सोने व प्लॅटिनम असल्याचे संकेत मिळाले असून जीएसआयतर्फे गेल्या दोन वर्षांपासून त्यावर काम केले जात आहे. डोंगराला असणारा उतार, मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस यामुळेच माळीण दुर्घटना घडली असल्याचा अहवाल जीएसआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. त्याचप्रमाणे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेल्या काही संवेदनशील स्थळांची पाहणी आम्ही केली असून त्यातील धोक्याच्या ठिकाणांची माहिती जीएसआयने संबंधित विभागाला कळविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gold particles in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.