दुबई, बँकॉकमधून सोने तस्करी सुरुच
By Admin | Published: June 23, 2017 02:03 AM2017-06-23T02:03:08+5:302017-06-23T02:03:08+5:30
दुबई, बॅँकॉकमधून मुंबईत सोने तस्करीचे सत्र सुरुच असल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणांकडून (एआययू) सुरु असलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुबई, बॅँकॉकमधून मुंबईत सोने तस्करीचे सत्र सुरुच असल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणांकडून (एआययू) सुरु असलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. बुधवारी मुंबई विमानतळावर केलेल्या तीन विविध कारवाईदरम्यान तब्बल १ कोटी १४ लाख ५४ हजार किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका व्यावसायिक महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
दुबईवरुन येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमान क्रमांक ९ डब्ल्यू ५३५ बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास मुंबई विमातळावर उतरले. तेव्हा विमानाच्या शौचालयातील एका कोपऱ्यात दोन पॅकेट तपास यंत्रणेच्या हाती लागले. त्यामध्ये तब्बल ३४ लाख ८० हजार किंमतीचे १ हजार १६० गॅ्रम सोने आढळून आले. तपास यंत्रणेने ते ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे सोने कोठून व कसे आले? याचा शोध सुरु असतानाच याच फ्लाईटमधून व्हिलचेअर असलेल्या प्रवासी निमिशा गुधखा (३८) याच्या संशयास्पद हालचाली तपास यंत्रणेने हेरल्या. तिच्या व्हिलचेअरची तपासणी केली असता, त्यामध्ये १९ लाख ८० हजार किंमतीचे ६६० ग्रॅम सोने आढळून आले. तर तिसऱ्या कारवाईत जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ०६७ मधील एका प्रवाशाकडून ५९ लाख ९४ हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. रविकिरण घनश्याम गोहेल (३५) असे प्रवाशाचे नाव असून तो बॅँॅकॉकमधून आला होता. त्याने त्याच्या सीटमध्ये हे सोने लपवून ठेवले होते.
या तिन्हीही कारवाईमध्ये एकूण १ कोटी १४ लाख ५४ हजार किंमतीचे सोने जप्त केले आहेत.