मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘गोल्डन अवर्स’ला यश

By Admin | Published: September 22, 2016 05:25 AM2016-09-22T05:25:01+5:302016-09-22T05:25:01+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक पोलिसांनी प्रयोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या गोल्डन अवर्स संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला

Golden Aars' success on Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘गोल्डन अवर्स’ला यश

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘गोल्डन अवर्स’ला यश

googlenewsNext


मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक पोलिसांनी प्रयोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या गोल्डन अवर्स संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गोल्डन अवर्समध्ये ८०० अवजड वाहने अडविल्याने २१ हजार कार चालकांचा फायदा झाला असून त्या सर्वांचे मिळून तब्बल ६ लाख तास वाचले आहेत. त्यामुळे ही मोहीम यापुढेही राबविण्यात येणार असून या मार्गावर वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या चालकांवर खासगी गाड्यांतूनही नजर ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी बुधवारी सांगितले. ते ओल्ड कस्टम हाऊस येथील वाहतूक पोलीस कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तिन्ही लेनवर अवजड वाहने सररास चालविली जातात. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. सुट्ट्यांच्या काळात आणि प्रत्येक विकेण्डला माहामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत असल्याचे महामार्ग पोलिसांच्या ठाणे आणि पुणे उपअधिक्षकांनी सांगितले होते. त्यानुसार अशा काळात गोल्डन अवर्स प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन आठवड्यांत याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गोल्डन अवर्सचा ही संकल्पना पुढेही राबविण्यात येणार आहे. तसेच या द्रुतगती महामार्गावरील वाहनांची वेगमर्यादा पुन्हा निश्चित करण्यासाठी संबंधित यंणांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे पद्मनाभ यांनी सांगितले.
गोल्डन अवर्स दर शुक्रवारी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी सकाळी ८ ते १२ पर्यंत, तर रविवारी दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत गोल्डन अवर्स राबविण्यात येतील.

Web Title: Golden Aars' success on Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.