द्रुतगती मार्गावर रविवारी गोल्डन अवर्स

By admin | Published: September 25, 2016 05:43 AM2016-09-25T05:43:18+5:302016-09-25T05:43:18+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी (दि. २५) सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान व सोमवारी पहाटे ६ ते सकाळी ९ या गोल्डन अवर्स अंतर्गत १४पेक्षा जास्त टायर असणाऱ्या

Golden Avatar on the Accelerated Road Sunday | द्रुतगती मार्गावर रविवारी गोल्डन अवर्स

द्रुतगती मार्गावर रविवारी गोल्डन अवर्स

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी (दि. २५) सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान व सोमवारी पहाटे ६ ते सकाळी ९ या गोल्डन अवर्स अंतर्गत १४पेक्षा जास्त टायर असणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. अवजड वाहने गोल्डन अवर्समध्ये द्रुतगतीवर वाहने आणू नयेत, असे आवाहन खंडाळा महामार्ग पोलिसांनी केले आहे.
द्रुतगतीवर सायंकाळी व सकाळी होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी गोल्डन अवर्स ही संकल्पना राबविण्यात आली आहे. १४पेक्षा जास्त टायर असणारी अवजड वाहने ही द्रुतगतीच्या एंट्री पॉइंटवर थांबविण्यात येणार आहेत. यामुळे एंट्री
पॉइंट परिसरात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आल्याने
अवजड वाहनांच्या चालकांनी शक्यता गोल्डन अवर्सच्या काळात वाहने द्रुतगतीवर आणू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Golden Avatar on the Accelerated Road Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.