सुवर्णाक्षरांचा खजिना!
By admin | Published: September 14, 2014 01:36 AM2014-09-14T01:36:10+5:302014-09-14T01:36:10+5:30
सुवर्णाक्षरात नाव कोरणो, हा वाक्प्रचार अनेकांनी ऐकला, वाचला असेल; पण पूर्वी शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या शाईने लिखाण केले
Next
विवेक चांदूरकर- अकोला
सुवर्णाक्षरात नाव कोरणो, हा वाक्प्रचार अनेकांनी ऐकला, वाचला असेल; पण पूर्वी शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या शाईने लिखाण केले जायच़े त्यातूनच ह्यसुवर्णाक्षरात लिहिले जाईल हा वाक्प्रचार रूढ झाला़ काही पुस्तकं बाळापूर येथील नक्षबंदी दग्र्यातील ग्रंथालयात आजही सुरक्षित आहेत, हे ऐकून कुणालाही आश्चर्यच वाटेल. बाळापूर येथील हे ग्रंथालय म्हणजे खजिनाच असून, येथे उर्दूत भाषांतर केलेली गीता आणि अनेक प्राचीन ग्रंथांचे जतन करण्यात आले आह़े
बाळापूर येथे सुफी संत खान-काए-नक्षबंदी यांची शेकडो वर्षे
जुनी दर्गा आहे. सर्वधर्मीय लोक
येथे आपला माथा टेकवितात. ही
दर्गा ऐतिहासिक असून, खुद्द
छत्रपती शिवाजी महाराजांनी दग्र्याला देणगी दिली होती. राजा औरंगजेबानेही या दग्र्यासाठी जमीन दिली होती. येथे प्राचीन पुस्तकांचा खजिना असलेले एक ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली काही हस्तलिखित पुस्तके आहेत.
ही पुस्तके 11क्क् ते 15क्क् वर्षापूर्वी अरबी व पारशी भाषेत लिहिलेली आहेत. यासोबतच अरबी, पारशी, उर्दू व हिंदी भाषेतील विविध प्राचीन ग्रंथही आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील काही महत्त्वाची दैनिकं तसेच मासिकांचे अंकही येथे पाहायला मिळतात. ही सर्व पुस्तके ग्रंथालयात सांभाळून ठेवण्यात आली आहेत. केवळ देशातीलच नव्हे, तर जपान, चीनसह देश-विदेशातील इतिहासकार, संशोधक येथे ऐतिहासिक पुरावे गोळा करण्यासाठी, संदर्भ पाहण्यासाठी आवजरून येत असतात़
ग्रंथालयात 11क्क् ते 15क्क् वर्षे जुनी पुस्तके आहेत. तद्वतच, सोन्याचा वर्ख असलेल्या शाईत लिखाण केलेली पुस्तकेही आहेत. ही पुस्तके आम्ही जपून ठेवली आहेत. पारशी व अरबी भाषेतील अनेक मौल्यवान ग्रंथही ग्रंथालयात आहेत.
- तल्लाह नक्षबंदी
ग्रंथालय प्रमुख, बाळापूर
च्पूर्वी राजे-महाराजे सोन्याचा वर्ख असलेल्या शाईमध्ये लिखाण करून घेत असत़ ही शाई तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. नद्यांमध्ये सहान नावाने ओळखला जाणारा दगड सापडतो.
च्या सहानीवर मध टाकून, त्यावर सोने घासण्यात येत होते. त्यामुळे सोन्याचे बारीक कण मधामध्ये मिसळतात. त्यापासून ही सोन्याचा वर्ख असलेली शाई तयार केली जायची. त्यानंतर टाकेने लिखाण केले जायचे. यालाच सुवर्णाक्षरात लिहिणो, असे म्हणतात.