'एक्सप्रेस वे' संदर्भातच्या सभेत गोंंधळ
By admin | Published: July 28, 2016 06:17 PM2016-07-28T18:17:36+5:302016-07-28T18:17:36+5:30
नागपूर ते मुंबई या सुपर कम्यूनिकेशन एक्सप्रेस वे संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा आणि शासनाची ध्येय धोरणे समजावून सांगण्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयात गुरूवारी सभेचे
ऑनलाइ लोकमत
मालेगाव, दि. २८ : नागपूर ते मुंबई या सुपर कम्यूनिकेशन एक्सप्रेस वे संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा आणि शासनाची ध्येय धोरणे समजावून सांगण्यासाठी मालेगाव तहसील कार्यालयात गुरूवारी सभेचे आयोजन प्रशासनातर्फे केले होते. दरम्यान, या सभेत एकच गोंधळ उडाल्याने अर्ध्यातच सभा आटोपण्यात आली.
या ह्यएक्सप्रेस वेमध्ये लॅण्ड पुलिंग योजनेव्दारे जमीन प्राप्त करने व विकसित जमिनीच्या स्वरुपात मोबदला प्रदान करण्याच्या सुचना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागातीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार, तलाठ्यांसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळीपॉईट प्रेझेंटेशनव्दारे सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी संदीपान सानप देत असताना, मध्येच शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले आले. इंगोले यांनी यावेळी शासनाच्या या योजनेत स्पष्ट मोबदल्याची माहिती नाही. त्यासाठी शासनाने बाजारभावाच्या चौपट भावाने रोख रक्कम द्यावी आणि शेतकऱ्याचे पुर्नवसन करुन मग प्रत्यक्ष काम सुरु करावी, असे मत मांडण्याला सुरूवात करताच, सभेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान, यावेळी माजी मंत्री सुबोध सावजी येथे आल्यानंतर गोंधळ सुरूच राहिला.
सावजी हा विषय शेतकऱ्यांच्या हिताचा असेल तर निश्चितच याला शेतकऱ्यांचे सहकार्य मिळेल, असे सांगितले. मात्र, गोंधळ सुरूच होता. बहुतांश शेतकरी इतरत्र गेल्याने प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणी दिसत नसल्याचे पाहून सदर सभा अर्ध्यावर आटोपण्यात आली.