रोजंदार मजुरांसाठी अच्छे दिन!
By admin | Published: July 29, 2015 02:56 AM2015-07-29T02:56:21+5:302015-07-29T02:56:21+5:30
राज्यातील ३ कृषी विद्यापीठांमधील रोजंदार मजुरांसाठी अच्छे दिन आले आहेत. अकोला, परभणी आणि दापोली कृषी विद्यापीठातील रोजंदार मजूर, तसेच कुशल व अर्धकुशल
वाशिम : राज्यातील ३ कृषी विद्यापीठांमधील रोजंदार मजुरांसाठी अच्छे दिन आले आहेत. अकोला, परभणी आणि दापोली कृषी विद्यापीठातील रोजंदार मजूर, तसेच कुशल व अर्धकुशल अशा एकूण ११५९ कर्मचाऱ्यांना, शासनाच्या २४ जुलैच्या आदेशानुसार सेवेत कायम केले जाणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठात कुशल, अर्धकुशल २६७ कर्मचारी आणि रोजंदारी २८३ असे एकूण ५५०, अकोल्यातील कृषी विद्यापीठात कुशल, अर्धकुशल ३१ कर्मचारी व रोजंदारी २५३ असे एकूण २८४, तर कोकण कृषी विद्यापीठात ३२५ रोजंदारी मजूर असे एकूण ११५९ कुशल, अर्धकुशल कर्मचारी व रोजंदारी मजूर कार्यरत आहेत. कुशल, अर्धकुशल कर्मचारी व रोजंदारी मजुरांना सेवेत कायम किंवा नियमित करण्याबाबत निर्णय झाला होता.