सोन्यावरील सीमाशुल्क वाढल्याने तस्करांना अच्छे दिन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 06:00 AM2019-07-07T06:00:00+5:302019-07-07T06:00:06+5:30

दुबई, अबुधाबी येथून पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातून दर महिन्याला किमान एक तरी तस्करी करुन आणलेल सोने पकडले जाते़...

Good day for smugglers due to increased gold customs! | सोन्यावरील सीमाशुल्क वाढल्याने तस्करांना अच्छे दिन! 

सोन्यावरील सीमाशुल्क वाढल्याने तस्करांना अच्छे दिन! 

Next
ठळक मुद्दे एका तोळ्यामागे ५ हजार रुपयांचा फरक

पुणे : भारतातील सोन्याच्या आयातीवरील सीमा शुल्क १० टक्क्यांवरुन १२ टक्के केल्यानंतर आंतरराष्ट्रीय सोन्याचे भाव व भारतातील सोन्याच्या भावात एका तोळ्यामागे किमान ५ हजार रुपयांचे अंतर असल्याने दुबई, अबुधाबीवरुन भारतात सोन्याच्या होणाऱ्या तस्करीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़. हे सोने कोठेही कागदपत्री दाखविले जात नसल्याने त्यातून भष्ट्राचार वाढणार आहे़.
दुबई, अबुधाबी येथून पुण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानातून दर महिन्याला किमान एक तरी तस्करी करुन आणलेल सोने पकडले जाते़. अनेकदा हे तस्कर इतके स्मार्ट झाले आहेत की, ते दरवेळी वेगवेगळ्या मार्गाने सोने चोरुन आणत असतात़ सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या हाताला लागलेले हे सोने आहे़. प्रत्यक्षात त्यांच्या नजरेतून सुटलेले किती सोने येते याची कोणतीही माहिती नाही़. 
दुबई, आबुदाबी येथून येणारी आंतरराष्ट्रीय विमाने पुण्यात आल्यानंतर ती पुढील स्थानिक विमानप्रवासासाठी वापरली जातात़. त्यामुळे अनेकदा तस्कर विमानातच एखाद्या ठिकाणी सोने दडवून ठेवतात व पुण्यात ते उतरुन जातात़ .त्यानंतर पुण्यातून त्यांचे साथीदार पुढच्या प्रवासासाठी बसतात व प्रवासादरम्यान विमानात लपवून ठेवलेले सोने ताब्यात घेतात़. देशांतर्गत प्रवासात प्रवासी उतरल्यानंतर त्यांची तपासणी होत नसल्याने ते सहीसलामत सोने घेऊन निघून जातात़. अशाप्रकारे १६ जूनला स्पाईस जेटच्या वॉश बेसिनच्या खाली लपवून ठेवलेली ५३ लाख रुपयांची ६६३ ग्रॅम वजनाची १४ सोन्याची बिस्किटे लपवून ठेवली होती़. १३ मे रोजी १६ लाख ७१ हजार रुपयांचे ६६४ ग्रॅम सोने पेस्ट स्वरुपात आणण्यात आले होते़. ७ मे रोजी ३१ लाखांचे ९५७ ग्रॅम सोने प्लॅस्टिकच्या बेल्टमध्ये लपवून आणण्यात आले होते़. 
 १८ मार्च २०१९ रोजी एक पुरुष कमरेच्या प्लॅस्टिकच्या पट्टीमध्ये पेस्ट स्वरुपातील १४ लाख रुपयांचे ५५९ ग्रॅम सोने घेऊन आला होता़. तो सीमा शुल्क विभागाच्या हाती लागला होता़. १५ मार्च २०१९ रोजी ३० लाख रुपयांचे सोने पकडण्यात आले होते़.
ज्यांना पैशांची आवश्यकता आहे़ अशांना हे तस्कर हेरतात़ अशा लोकांना ते काम शोधण्यासाठी दुबई, अबुधाबी येथे मुंबई किंवा इतर विमानतळावरुन पाठवितात़. त्यानंतर दोन दिवसांनी ते तस्करीचे सोने घेऊन पुण्यात किंवा गोवा येथे येतात़. अनेकदा ते अशा पद्धतीने सोने घेऊन येतात की विमानतळावरील एक्सरे मशीनमध्येही दिसून येत नाही़. 
.......
सोने तस्करी
गेल्या वर्षी एक महिला ग्रीन चॅनेलमधून जात असताना सीमा शुल्क विभागाच्या अधिकाºयांना संशय आला़. त्यांनी तिला एक्स रेच्या समोरुन जाण्यास सांगितले़ पण तरीही बीप वाजला नाही़. त्यानंतर तिची तपासणी केल्यावर तिने कमरेला बांधलेल्या पट्ट्याच्या आतमध्ये प्लॉस्टिकच्या बॅगमध्ये व अंतवस्त्रांमध्ये तब्बल २ किलो ७९१ ग्रॅम सोने पेस्ट स्वरुपात आणले होते़ त्याची किंमत तब्बल ९० लाख रुपये होती़. 
एखादा तस्कर अर्धा ते एक किलो सोने चोरुन घेऊन आला तर त्याला एका फेरीत काही लाख रुपये मिळू शकतात़. हवाला व्यवहारामार्फत हे पैसे मिडल इस्ट देशात जातात व ते सोन्याच्या तस्करीसाठी वापरले जात आहेत़. सीमा शुल्कामध्ये वाढ झाल्याने सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता आहे, असे सीमा शुल्क अधिकाºयांनी सांगितले़.

भारत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावात १२ टक्के सीमाशुल्क व ३ टक्के जीएसटी यामुळे १० ग्रॅममागे तब्बल ५ हजार रुपयांपर्यंतचा फरक पडतो़. त्यातून भष्ट्राचार वाढण्याची शक्यता आहे़ दत्तात्रय देवकर, सचिव महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन
...........
९५ टन सोने तस्करीतून आले भारतात 
पूर्वी सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर सीमा शुल्क आकारले जात असल्याने मुंबईतील गुन्हेगारी विश्व या सोने तस्करीतून फोफावले होते़. उदारीकरणानंतर सोन्यावरील सीमा शुल्क कमी कमी करीत आणण्यात आला होता़ त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाव व भारतातील भावात तफावत राहिली नाही़. त्यामुळे ते तस्करी करुन आणणे परवडत नसल्याने मधल्या काळात सोन्याची तस्करी पूर्णपणे बंद झाली होती़. आॅगस्ट २०१३ मध्ये केंद्र सरकारने १० टक्के सीमाशुल्काची आकारणी करण्यास सुरुवात केली़. त्यानंतर ग्रे मार्केटमध्ये तस्करी करुन आणलेल्या सोन्याची रोखीत व्यवहार होऊ लागले़ मुंबई, हैदराबाद, गोवा, पुणे तसेच दिल्ली या ठिकाणी प्रामुख्याने परदेशातून येणाºया आंतरराष्ट्रीय फ्लाईटद्वारे सोन्याची तस्करी केली जाते़. 
वल्डे गोल्ड कॉन्सिलच्या मते २०१८ मध्ये तब्बल ९५ टन सोन्याची तस्करी करुन भारतात आणण्यात आले़.  आता सीमा शुल्कात आणखी वाढ केल्याने यापुढे सोन्याच्या तस्करीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़. 
 

Web Title: Good day for smugglers due to increased gold customs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.