वर्क फ्राॅम होममुळे भेळीला चांगले दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 06:18 AM2022-01-24T06:18:17+5:302022-01-24T06:18:43+5:30
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला, तर कोरोनामुळे अनेकांना कामही मिळाले, हेही नाकारता येत नाही. घरीच राहत असल्यामुळे पैशाचीही चांगली बचत झाली आहे.
कोरोनामुळे दोन वर्षांपासून काॅर्पोरेट क्षेत्रातील बंगळुरू- पुणे- मुंबई येथे काम करणाऱ्या तरुण मुला-मुलींना वर्क फ्राॅम होममुळे बराच काळ आपल्या गावात व घरी राहून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे घरापासून व कुटुंबापासून दुरावलेल्या तरुण- तरुणींना आपल्या कुटुंबाच्या सहवासाचा, घरच्या जेवणाचा आनंद घेता आला.
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला, तर कोरोनामुळे अनेकांना कामही मिळाले, हेही नाकारता येत नाही. घरीच राहत असल्यामुळे पैशाचीही चांगली बचत झाली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुले आता आपल्याच गावात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करीत असल्यामुळे स्थानिक व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत, तसेच संध्याकाळी गावातल्या चाट व भेळभांडार, मंच्युरियन, नूडल्स, बर्गर, पिझ्झाच्या गाड्यांवर गर्दी दिसत आहे. त्यामुळे स्थानिक चाट व भेळभांडार, मंच्युरियन, नूडल्स, बर्गर, पिझ्झासारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांना चांगले दिवस आले.
-प्रा. अशोक बोंगीरवार, हिंगणघाट