वारसदारांना ‘अच्छे दिन’
By Admin | Published: February 24, 2017 04:48 AM2017-02-24T04:48:18+5:302017-02-24T04:48:18+5:30
सत्ता कोणतीही असो, ती कुटुंबातच राहिली पाहिजे, याकडेच अनेक नेत्यांचा कटाक्ष असतो. जिल्हा परिषद
उस्मानाबाद : सत्ता कोणतीही असो, ती कुटुंबातच राहिली पाहिजे, याकडेच अनेक नेत्यांचा कटाक्ष असतो. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक तर नेत्यांनी जणू काही आपल्या कुटुंबातील वारसदारांच्या ‘लाँचिंग’साठीच लढल्याचे दिसून आले. यात काहींना मतदारांनी नाकारले असले तरी अनेकांच्या वारसदारांना या निवडणुकीतील विजयामुळे ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.
औसा मतदारसंघाचे आ. बसवराज पाटील यांनी त्यांचे पुत्र शरण पाटील यांना उमरगा तालुक्यातील आलूर गटातून मैदानात उतरविले होते. पाटील यांनी येथे १७४४ मताधिक्याने विजय मिळविला. आता उमरगा-लोहारा तालुक्यातील काँग्रेसची सूत्रे शरण पाटील यांच्याकडे अधिकृतरित्या राहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. मधुकरराव चव्हाण यांनीही त्यांचे पुत्र बाबूराव चव्हाण यांना अणदूर गटातून रिंगणात उतरविले होते. त्यांची लढत माजी आ. आलुरे गुरूजी यांचे नातू दीपक आलुरे यांच्याशी होते. येथे चव्हाण यांनी बाजी मारली. याबरोबरच गुंजोटी मतदारसंघातून भाजपा नेते तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैैलास शिंदे यांचे पुत्र दिग्विजय शिंदे विजयी झाले आहेत. भाजपाचेच ज्येष्ठ नेते शिवाजी चालुक्य यांचे पुत्र अभय पाटील तुरोरीतून तर चालुक्य यांच्या भगिनी जकेकूर विजयी झाल्या. (प्रतिनिधी)
उस्मानाबाद
पक्षजागा
भाजपा०४
शिवसेना११
काँग्रेस१३
राष्ट्रवादी२६
इतर०१