अच्छे दिन आएंगे, चुना लगाएंगे...
By admin | Published: September 22, 2014 09:22 AM2014-09-22T09:22:12+5:302014-09-22T09:35:28+5:30
मोदी सत्तेत आल्यानंतर ‘अच्छे दिन आएंगे, चुना लगाएंगे’ अशी चित्र निर्माण झाल्याचा प्रचार प्रदेश काँग्रेसच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
काँग्रेसचा प्रचार फंडा : नो उल्लू बनाविंग
मुंबई : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी ‘अच्छे दिन आएंगे’ची आशा दाखविली होती पण ते सत्तेत आल्यानंतर ‘अच्छे दिन आएंगे, चुना लगाएंगे’ अशी चित्र निर्माण झाल्याचा प्रचार प्रदेश काँग्रेसच्या वतीने पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या पथनाट्यासाठी विशेषत: तरुण-तरुणींना संधी देण्यात आली असून प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. मोदी सरकारचे पितळ उघडे पाडणाऱ्या या पथनाट्यामध्ये, ‘जब आयडिया इंटरनेट लगाविंग, नो उल्लू बनाविंग’ अशी कोपरखळीही मारण्यात आली आहे.
चलाओ ना नैनो से बाण रे, जान लेलो ना जान रे’ या गाण्याच्या चालीवर, पंजाला करू मतदान रे, मिळून सारेच जण रे.. असे गाणे या पथनाट्यात समाविष्ट करण्यात आले आहे. ‘इंचू चावला रे इंचू चावला’ या जुन्या लोकप्रिय गाण्याच्या चालीवर, ‘महागाई, हुकूमशाहीचा, मोदीचा इंचू चावला रे, इंचू चावला, असे गाणेही सादर करण्यात आले आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ लाखो लोकांना आधीपासूनच मिळत असल्याने त्यांच्या जीवनात अच्छे दिन आधीपासूनच आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात आमची फसवणूक करण्यात आली, आता आम्ही फसणार नाही, असा निर्धार या पथनाट्यात व्यक्त केला आहे. (विशेष प्रतिनिधी)