वारकऱ्यांना चांगल्या सुविधा
By admin | Published: July 28, 2016 04:33 AM2016-07-28T04:33:22+5:302016-07-28T04:33:22+5:30
पंढरपूर येथील प्रत्येक यात्रेवेळी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून सरकारच्या प्रयत्नात काही त्रुटी असतील तर त्याअनुषंगाने लवकरच एक आढावा बैठक घेऊन
मुंबई : पंढरपूर येथील प्रत्येक यात्रेवेळी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून सरकारच्या प्रयत्नात काही त्रुटी असतील तर त्याअनुषंगाने लवकरच एक आढावा बैठक घेऊन आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले. आळंदी ते पंढरपूर या दिंडी मार्गावर जागा आरक्षित करुन त्यावर वारकऱ्यांकरीता हॉल बांधून त्या ठिकाणी राहण्याची सोयही करुन दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब मुरकुटे यांच्या लक्षवेधीवर बरीच चर्चा सभागृहात झाली. आळंदीपेक्षा पाच पट मोठे क्षेत्र पंढरपूर येथे असतानाही त्याच्या विकासासाठी निधी कमी प्रमाणात दिला जातो, असा आक्षेप भारत भालके यांनी नोंदविला.
पंढरपुरातील रस्ते, गटारी यात्रेवेळी कमी पडतात, त्यांच्यावर ताण पडतो. त्यामुळे चांगल्या
सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारने
केला पाहिजे अशी अपेक्षा भालके यांच्यासह गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली. पंढरपूरसाठी प्राधिकरण नेमण्याची घोषणा झाली,पण नेमक्या किती काळात त्याची कार्यवाही
पूर्ण होणार अशी विचारणा देशमुख यांनी केली. निवारा व्यवस्था, पार्कींगची सोय उपलब्ध करुन देण्याची मागणी मुरकुटे यांनी सभागृहात केली. तर भालके यांनी चंद्रभागा नदीच्या प्रदुषणाचा
मुद्दा चर्चेत आणला. प्रणिती
शिंदे यांनी पंढरपूरसह राज्यातील
सर्वच मोठ्या देवस्थान परिसरात आपत्ती व्यवस्थापनची सुविधा मजबुत करण्यात यावी अशी
मागणी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी
जेथे मोठ्या यात्रा भरतात तेथील आपत्ती व्यवस्थापनाचे आॅडिट करण्याच्या सूचना दिल्या जातील असे सांगितले. (प्रतिनिधी)