खूशखबर, २०१६ मध्ये सात सुट्या सोमवारी !

By Admin | Published: October 6, 2015 02:12 AM2015-10-06T02:12:02+5:302015-10-06T02:12:02+5:30

घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर धकाधकीच्या जीवनात कायमच वीकेंडची वाट बघत असतो. कामाचा शीण वीकेंडमध्ये मजा करून निघून जावा, यासाठी मुंबईकरांची

Good Friday, in 2016, on seven Sundays! | खूशखबर, २०१६ मध्ये सात सुट्या सोमवारी !

खूशखबर, २०१६ मध्ये सात सुट्या सोमवारी !

googlenewsNext

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर चालणारे मुंबईकर धकाधकीच्या जीवनात कायमच वीकेंडची वाट बघत असतो. कामाचा शीण वीकेंडमध्ये मजा करून निघून जावा, यासाठी मुंबईकरांची धडपडदेखील नेहमीचीच. मुंबईकरांना २०१६ साली तब्बल सात सार्वजनिक सुट्या सोमवारी मिळणार आहेत. त्यामुळेच मुंबईकरांचे पुढच्या वर्षीची वीकेंड्स प्लॅनिंग जोरदार होणार यात शंकाच नाही.
पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नवीन वर्षाच्या २०१६ च्या दिनदर्शिकेची तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच नवीन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशित होतील. पुढील वर्षी २०१६ मध्ये तब्बल सात सुट्या सोमवारी म्हणजे रविवारला जोडून येत आहेत, तर चार सुट्या रविवारी आहेत.
नव्या वर्षात २०१६ मध्ये होळी आणि गुड फ्रायडे, डॉ. आंबेडकर जयंती आणि श्रीरामनवमी, दसरा आणि मोहरम या सुट्या रविवारला जोडून आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना टूरटूरची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

२०१६ मधील सोमवारच्या सुट्या
महाशिवरात्री
सोमवार
७ मार्च
स्वातंत्र्य दिन
सोमवार
१५ आॅगस्ट
श्री गणेश चतुर्थी
सोमवार
५ सप्टेंबर
बकरी ईद
सोमवार
१२ सप्टेंबर
दीपावली -
बलिप्रतिपदा
सोमवार ३१ आॅक्टोबर
गुरूनानक जयंती
सोमवार
१४ नोव्हेंबर
ईद-ए-मिलाद
सोमवार
१२ डिसेंबर

सन २०१६ मधील उत्सवांचे दिवस
प्रजासत्ताक दिन
मंगळवार २६ जानेवारी
होळी - धूलीवंदन
गुरुवार २४ मार्च
डॉ. आंबेडकर जयंती
गुरुवार १४ एप्रिल
महाराष्ट्र दिन
रविवार १ मे
पारसी न्यू इयर
बुधवार १७ आॅगस्ट
मोहरम
बुधवार १२ आॅक्टोबर
छ. श्री शिवाजी महाराज जयंती
शुक्रवार १९ फेब्रुवारी
गुड फ्रायडे
शुक्रवार २५ मार्च
श्री रामनवमी
शुक्रवार १५ एप्रिल
बुद्ध पौर्णिमा
शनिवार २१ मे
महात्मा गांधी जयंती
रविवार २ आॅक्टोबर
दीपावली - लक्ष्मीपूजन
रविवार ३० आॅक्टोबर
गुढीपाडवा
शुक्रवार ८ एप्रिल
श्री महावीर जयंती
मंगळवार १९ एप्रिल
रमज़ान ईद
बुधवार ६ जुलै
दसरा - विजया दशमी
मंगळवार ११ आॅक्टोबर
ख्रिसमस - नाताळ
रविवार २५ डिसेंबर

Web Title: Good Friday, in 2016, on seven Sundays!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.