उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा : पीयूष गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 07:41 AM2022-10-11T07:41:42+5:302022-10-11T07:41:55+5:30

एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत विश्वास व्यक्त

Good infrastructure in the state for industry growth: Piyush Goyal | उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा : पीयूष गोयल

उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा : पीयूष गोयल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतिशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. सन २०४७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर एवढी होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मुंबईत आयोजित चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत ते बोलत होते.  महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप लिमिटेडने या परिषदेचे आयोजन केले आहे.  नामवंत गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, विविध देशांचे वाणिज्य दूत आणि महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यापूर्वी अशी गोलमेज परिषद दिल्ली, कोची आणि अहमदाबाद येथे झाली होती.
गोयल म्हणाले, राज्यात  मेट्रो, ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. लॉजिस्टिकचा खर्च कमी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.

गुंतवणुकीसाठी पुढे यावे : उपमुख्यमंत्री फडणवीस
केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यात उद्योग वाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उद्योजकांसाठी प्रोत्साहनांचे पॅकेज तयार आहे. औरंगाबाद येथे ओरिक सिटीमध्ये एक उत्तम परिसंस्था तयार केली आहे. याठिकाणी प्लग आणि प्ले यासारख्या सुविधा तयार आहेत. इथे मिळालेली जागा अपुरी पडेल, असा प्रतिसाद याठिकाणी मिळतो आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Good infrastructure in the state for industry growth: Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.