Marriage: शुभमंगल सावधान...! नववर्षात विवाहाचे तब्बल ८९ मुहूर्त, अशी आहे संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:58 AM2022-04-05T09:58:10+5:302022-04-05T09:58:56+5:30

Marriage Muhurta: चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) ते फाल्गुन अमावास्या, अशी प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात (२०२२ ते २०२३) यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त आहेत

Good luck ...! This is the complete list of 89 wedding Muhurta in the New Year | Marriage: शुभमंगल सावधान...! नववर्षात विवाहाचे तब्बल ८९ मुहूर्त, अशी आहे संपूर्ण यादी

Marriage: शुभमंगल सावधान...! नववर्षात विवाहाचे तब्बल ८९ मुहूर्त, अशी आहे संपूर्ण यादी

googlenewsNext

- प्रवीण खापरे
नागपूर : चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) ते फाल्गुन अमावास्या, अशी प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात (२०२२ ते २०२३) यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त असून, त्यात शुद्ध शास्त्रानुसार ६२, तर चातुर्मास काळातील आपत्कालीन, असे २७ मुहूर्त काढण्यात आले आहेत. 
भारतीय प्राचीन आश्रम व्यवस्थेतील पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमात (विद्यार्थी दशा) प्रवेश करताना करावा लागणारा उपनयन (मुंज) संस्कार महत्त्वाचा मानला जातो. या संस्काराचे एकूण ४७ मुहूर्त असून, २२ मुहूर्त हे शुद्ध शास्त्रीय, तर २५ मुहूर्त हे आपत्कालीन असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

शुद्ध शास्त्रानुसार योग्य विवाह मुहूर्त 
चैत्र ते आषाढ मास (२०२२)
एप्रिल - १५, १७, २१, २४, २५ (पाच दिवस)
मे - ४, १०, १३, १४, १६, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ (१२ दिवस)
जून - १, ६, ८, १०, १३, १४, १४, १६, १८ (नऊ दिवस)
जुलै - ३, ५, ६, ७, ८, ९ (सहा दिवस)

मार्गशीर्ष ते फाल्गुन 
(तुळशी विवाहानंतर २०२२-२३)
- नोव्हेंबर - २५, २६, २८, २९ (चार दिवस)
- डिसेंबर - २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८ (आठ दिवस)
- जानेवारी - १८, २६, २७, ३१ 
(चार दिवस)
- फेब्रुवारी - ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८ (१० दिवस)
- मार्च - ९, १३, १७, १८ (चार दिवस)

चातुर्मासातील  आपत्कालीन विवाह मुहूर्त
आषाढ ते कार्तिक (२०२२)
जुलै - १४, १५, ३१ (तीन दिवस)
ऑगस्ट - ३, ४, ७, ९, १०, १५, १६, २०, 
२१, २९ (१० दिवस)
सप्टेंबर - ७, ८, २७, ३० (चार दिवस)
ऑक्टोबर - ६, ९, १०, ११, २१, ३१ (सहा दिवस)
नोव्हेंबर - ५, ६, १०, १७ (चार दिवस)

गौणकाळातील व चातुर्मास काळातील मुहूर्त (२०२२)
 जुलै - १, ४, १५, १८ (चार दिवस)
 ऑगस्ट - ३, ७, १४, १६, २९ (पाच दिवस)
 सप्टेंबर - ६, २७, ३० (तीन दिवस)
 ऑक्टोबर - ५, ११, ३० (तीन दिवस)
 नोव्हेंबर - ३, १३, १४, २८ (चार दिवस)
 डिसेंबर - २, ४, २७ (तीन दिवस)
 जानेवारी - १, ९, १२ (तीन दिवस)

उपनयन संस्कार
मुख्य काळातील मुहूर्त (२०२२-२३)

एप्रिल - ३, ६, ११, १३, २१ (पाच दिवस)
मे - ५, ६, ११, १८, २० (पाच दिवस)
जून - १, ६, १६ (तीन दिवस)
जानेवारी - २६, ३१ (दोन दिवस)
फेब्रुवारी - ८, १०, २२, २४ (चार दिवस)
मार्च - १, ३, ९ (तीन दिवस)

 

Web Title: Good luck ...! This is the complete list of 89 wedding Muhurta in the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.