हागणदारीमुक्तीसाठी ‘गुड मॉर्निंग’ पथक
By Admin | Published: May 19, 2017 12:56 AM2017-05-19T00:56:17+5:302017-05-19T00:56:17+5:30
राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ‘गुड मॉर्निंग’ पथकांची निर्मिती करण्यात येणार असून त्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी जनजागृती
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये ‘गुड मॉर्निंग’ पथकांची निर्मिती करण्यात येणार असून त्या माध्यमातून हागणदारीमुक्तीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे. हे पथक दररोज सकाळी फिरून उघड्यावर शौचास बसलेल्यांचे प्रबोधन करेल. नगरविकास विभागाने आज या बाबतचा आदेश काढला.
या पथकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाांचे प्रतिनिधी, हागणदारी मुक्तीबाबत काम केलेल्या वा या विषयात आवड असलेले विद्यार्थी, स्थानिक गरजांनुसार विविध समाज घटकांचे/ सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. हे पथक २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत दररोज सकाळी श्हरात फिरून नागरिकांची उघड्यावर शौचास जाण्याची सवय बंद करण्यासाठी प्रयत्न करेल. एखाद्याच्या घरी शौचालय नाही म्हणून तो उघड्यावर शौचास बसला तर त्याला शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पथक कार्यवाही करेल. प्रबोधन करूनही एखादी व्यक्ती वारंवार उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास अशा व्यक्तीवर दंडात्मक कारवाईचे अधिकार पथकाला असतील.