खूशखबर! गिरणी कामगारांना 50 टक्के घरे राखीव
By admin | Published: May 17, 2017 10:50 AM2017-05-17T10:50:21+5:302017-05-17T10:50:21+5:30
एमएमआरडीए क्षेत्रातील भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामागारांना 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - एमएमआरडीए क्षेत्रातील भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामागारांना 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्वावरील घर योजनेत गिरणी कामगारांसाठी 50 टक्के घरे राखीव ठेवण्याला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे गिरणी कामागारांना आणखी 7700 घरे उपलब्ध होणार आहेत.
यापूर्वी राज्य सरकारने गिरणी कामगारांना 10, 768 घरांचे वाटप केले आहे. आता हाच आकडा 18,468 होणार आहे. समाजातील सर्व घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी टि्वटरवरुन या निर्णयाची माहिती दिली.
राज्य सरकारकडून आतापर्यंत बंद गिरण्याच्या जागांवर बांधण्यात आलेल्या घरांचे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना वाटप केले आहे. म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकारने ही घरे बांधली आहेत. प्रत्यक्षात गिरणी कामागारांचा आकडा लाखोच्या घरात आहे. त्यातुलनेत घराची संख्या तुटपुंजी आहे.
Huge Relief:
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2017
CM @Dev_Fadnavis approves 50% share to mill workers in all the rental housing schemes in MMR region henceforth.