राज्यातील १२,७९३ कोतवालांसाठी आनंदाची बातमी! मानधन दुपटीने वाढले, महसूलमंत्र्याकडून वचनपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 07:57 PM2023-04-06T19:57:15+5:302023-04-06T19:57:56+5:30

राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता, १२,७९३ कोतवालांना फायदा होणार

Good news for Kotwals of talathi Office! Salary doubled, a promise made by the Revenue Minister | राज्यातील १२,७९३ कोतवालांसाठी आनंदाची बातमी! मानधन दुपटीने वाढले, महसूलमंत्र्याकडून वचनपूर्ती

राज्यातील १२,७९३ कोतवालांसाठी आनंदाची बातमी! मानधन दुपटीने वाढले, महसूलमंत्र्याकडून वचनपूर्ती

googlenewsNext

मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. 

राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती. अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व १२,७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. हे मानधन ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.

Web Title: Good news for Kotwals of talathi Office! Salary doubled, a promise made by the Revenue Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.