लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी, आता चातुर्मासातही बिनधास्त करा लग्न!
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 21, 2023 11:36 AM2023-03-21T11:36:03+5:302023-03-21T11:36:12+5:30
पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ तिथी
छत्रपती संभाजीनगर : यंदा लग्नतिथी कमी असली, तरी चिंता करू नका... कारण अधिकमास- चातुर्मास काळातही लग्न करता येणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर तुळशीच्या विवाहाची वाट पाहावी लागणार नाही. एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान आपत्कालीन ३७ लग्नतिथी पंचांगकर्त्यांनी दिल्या आहेत. मग उडू द्या लग्नाचा बार...
गौणकाल आणि आपत्कालीन मुहूर्त
एप्रिल : १५, २३, २४, २९, ३०.
जून : ३०,
जुलै : १, २, ४, ५, ९, १०, ११, १४.
ऑगस्ट : २२, २६, २८,२९.
सप्टेंबर : ३, ६, ७, ८, १७, २४, २६.
ऑक्टोबर : १६, २०, २२. २३, २४, २६.
नोव्हेंबर : १, ६, १६, १८, २०,२२.
अधिक मास : १८ जुलै ते १६ ऑगस्ट
चातुर्मास : २९ जून ते २३ नोव्हेंबर
मुख्य काळातील लग्नतिथी
मे २०२३ : २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२,२९, २९, ३०.
जून : १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २६, २७. २८.
डिसेंबर : ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.
पंचांगकर्त्यांचे एकमत : पूर्वी चातुर्मासात (पर्जन्यकाळात) घरासमोर मांडवात विवाह करीत असल्याने आणि प्रवासाची साधने नसल्याने विवाह मुहूर्त दिले जात नव्हते. मात्र, महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात मागील ६० ते ७० वर्षांपासून पंचागकर्ते चातुर्मासात विवाह मुहूर्त देत आहेत. आता मंगल कार्यालयात विवाह लावले जातात व प्रवासही सुखकर झाल्याने महाराष्ट्रातही चातुर्मास काळात लग्नतिथी देण्यात याव्यात यावर १८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या सर्व पंचांगकर्त्यांच्या बैठकीत एकमत झाले.
आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणासाठी ?
चातुर्मासात आपत्कालीन विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. ज्यांचे आधीच लग्न ठरले आहे किंवा साखरपुडा झाला आहे, घरात कोणी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहे, त्यांच्या डोळ्यासमोर लग्न लावायचे आहे किंवा कोणाची नोकरी विदेशात आहे. त्यांना दिवाळीनंतर सुट्या मिळत नाहीत, अशांनी आपत्कालात विवाह करावा, तसेच मुख्य काळात मंगल कार्यालय उपलब्ध झाले नाही. काही अडचण आली, आपत्कालात विवाह करावा. - वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी