शिक्षण सेवकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 08:49 PM2022-12-22T20:49:46+5:302022-12-22T20:54:46+5:30

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Good news for Shikshan Sevak ! The decision of the state cabinet to increase the remuneration | शिक्षण सेवकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शिक्षण सेवकांसाठी खुशखबर! मानधनात वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

googlenewsNext

मुंबई : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षण सेवकांसाठी एक खुशखबर आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार, आता प्राथमिक शिक्षकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना २० हजार रुपये मानधन करण्यात येणार आहे. 

दरम्यान, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना तसेच शिक्षण सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला आणला होता. उच्च न्यायालयाने देखील एका निवाड्यात निकाल देताना शिक्षण सेवकांच्या अल्पशा मानधनाविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, प्राथमिक शिक्षकांना १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना १८ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना २० हजार रुपये मानधन करण्यात येणार आहे. 

२००० पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिली तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून मानधन दिले जाते. त्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते. पूर्वीच्या मानधनात सप्टेंबर २०११ ला वाढ झाली होती. त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना ६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना ८ हजार रुपये व उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना ९ हजार रुपये मानधन दिले जात होते. नऊ वर्षांत शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शिक्षण सेवक यांच्याकडून होत होती. 

Web Title: Good news for Shikshan Sevak ! The decision of the state cabinet to increase the remuneration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.