सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; ४% वाढीव महागाई भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 05:49 AM2021-01-03T05:49:18+5:302021-01-03T05:49:45+5:30
Government employees: याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्के वाढविण्यात आला होता. तसेच त्याआधी जानेवारी २०२० मध्ये त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी २०२१ मध्ये देय असलेली ४ टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ ११ टक्के होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जानेवारी २०२१ पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ निश्चित आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता २८ टक्के होईल.
याआधी जुलै २०२० मध्ये महागाई भत्ता ३ टक्के वाढविण्यात आला होता. तसेच त्याआधी जानेवारी २०२० मध्ये त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली होती.
आता जानेवारी २०२१ मध्ये देय असलेली ४ टक्के वाढ झाल्यानंतर एकूण वाढ ११ टक्के होईल. सध्या सरकारने महागाई भत्त्यातील वाढ गोठविलेली आहे. त्यामुळे हा वाढीव भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.
आता एकत्रित ११ टक्के वाढीसह महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. नव्या वाढीनंतर तो २८ टक्के होईल.
महागाई भत्त्याचे अभ्यासक तथा एजी ऑफिस ब्रदरहूडचे माजी
अध्यक्ष आणि सिटिझन्स ब्रदरहूडचे अध्यक्ष हरिशंकर तिवारी आणि शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनुराग सिंह यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये महागाई निर्देशांक ८ अंकांनी घसरल्यास महागाई भत्ता ३ टक्के
देय असेल, तसेच निर्देशांकात २४ अंकांची वाढ झाल्यास भत्ता ५ टक्के देय असेल.
निवृत्तीधारकांनाही लाभ
n कोणत्याही एका महिन्यात एवढी तीव्र वाढ अथवा घट शक्य नसते. त्यामुळे महागाई भत्ता ४ टक्के देय असेल.
n डिसेंबरचा निर्देशांक एक महिन्यानंतर जारी होईल.
n महागाई भत्त्यातील वृद्धीचा
केंद्र सरकारच्या ५० लाख कर्मचाऱ्यांना तसेच ६० लाख निवृत्तांना लाभ होईल. विभिन्न राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल.