खूशखबर! मुंबईत "म्हाडा"च्या 800 घरांसाठी लवकरच लॉटरी

By admin | Published: June 26, 2017 07:04 PM2017-06-26T19:04:54+5:302017-06-26T19:09:47+5:30

मुंबईतल्या म्हाडाच्या सुमारे 800 घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे.

Good news! Lottery for 800 homes of "MHADA" soon in Mumbai | खूशखबर! मुंबईत "म्हाडा"च्या 800 घरांसाठी लवकरच लॉटरी

खूशखबर! मुंबईत "म्हाडा"च्या 800 घरांसाठी लवकरच लॉटरी

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - मुंबईतल्या म्हाडाच्या सुमारे 800 घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असून, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हाडाच्या 800 घरांसाठी जाहिरात दिली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे.
दरवर्षी 31 मे रोजी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्याचा पायंडा आहे. यंदा मे उलटून गेला तरी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक जण यंदा लॉटरी नसेल असे कयास बांधूनही मोकळे झाले. मात्र यंदा उशीर झाला असला तरीही लवकरच लॉटरीची जाहिरात देऊ, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

यंदा पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड आदी भागातील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र तरीही जुलै महिन्यातच म्हाडा घरांची यादी प्रसिद्ध करेल, असे म्हाडानं सांगितलं आहे. मुंबईत परवडणारं घरं घेणं प्रत्येक व्यक्तीला सहज शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहावी लागते. मात्र यंदा म्हाडाची लॉटरी फक्त 800 घरांसाठी असून, म्हाडाच्या घरांची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. 

Web Title: Good news! Lottery for 800 homes of "MHADA" soon in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.